वर्क फ्रॉम होम हवय ? मग ९ तास कॅमेरासमोर बसून काम करा !

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी शाळा कॉलेजेस बरोबरच चित्रपटगृहे, क्लब, पब, जीम बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोर अनेक कंपन्यानी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेशही दिले आहेत. घरात बसूनच काम करावयाचे असल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पण बंगळुरूच्या एका कंपनीने मात्र घरात बसून कर्मचारी खरंच काम करतात की टाईमपास याची खात्री करण्यासाठी ९ तास कॅमेऱ्यासमोर बसून काम करा अशा सूचनाच दिल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वर्क फ्रॉम होमबरोबरच रिलॅक्स होण्याच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे.

कंपनीच्या या निर्णयावर अनेकांनी टि्वटरवर टीका केली असून कंपनीने कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखवायला हवा असे म्हटले आहे. तर काहींनी कॅमेऱ्यासमोर बसून काम करा नाहीतर तुमची खैर नाही असे टु्वट करत कर्मचाऱ्यांना सावध केले आहे.