आजपासून बँक राहणार बंद!

Bank Bandh: Govt bank employees to call for 2 day strike from Jan 31
तीन दिवस बँक राहणार बंद!

बँक ग्राहकांकरता एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमची बँकेची काही कामे असतील तर ती येत्या दोन दिवसात उरका कारण तीन दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे तुमचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकेंडपर्यंत थांबू नका, गुरुवारपर्यंत बँकिंगची कामे करा. १ फ्रेबुवारी रोजी पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. मात्र, असे असले तरी याच दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र, बँक कर्मचारी संपावर ठाम असल्यामुळे शुक्रवार ते रविवार, असे सलग तीन दिवस बँकिंग सेवा बंद राहणार आहे.

का करणार आहेत संप

वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी शुक्रवार (३१ जानेवारी) आणि (१ फ्रेबुवारी) शनिवार अशी दोन दिवस संपाची हाक दिली आहे. तर २ फ्रेबुवारीला रविवार असल्यामुळे आठवडा अखेर सलग तीन दिवस बँक बंद राहणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या ३१ जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. त्यानंतर शनिवारी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. १ फेब्रुवारी हा पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. मात्र ‘बजेट’च्या दिवशी कर्मचारी संघटनांच्या संपामुळे आठवडाअखेर तीन दिवस बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘इंडियन बँक असोसिएशन’सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे.

फेब्रुवारीत ११ दिवस बँका बंद

फेब्रुवारीत तब्बल ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात ६ सार्वजनिक सुट्ट्या असून दुसरा आणि चौथा शनिवार-रविवार आणि १ फेब्रुवारीचा संपाचा दिवस, असे ११ दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – मुंबईतील आणखी २४ उड्डाणपुलांचे सर्वेक्षण होणार!