घरदेश-विदेशBank Holidays : जून महिन्यात तब्बल ९ दिवस बँका बंद, पाहा सुट्ट्यांची...

Bank Holidays : जून महिन्यात तब्बल ९ दिवस बँका बंद, पाहा सुट्ट्यांची यादी

Subscribe

जूनमध्ये साप्ताहिक सुट्टीशिवाय केवळ ३ स्थानिक उत्सव आहेत.

जर तुम्हाला बँकांची कामे उरकायची असतील तर एकादा जून महिन्याचे कॅलेंडर पाहूनच बाहेर पडा. कारण जून महिन्यात तब्बल नऊ दिवस बँका बंद असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर जून महिन्यात नऊ दिवस बँकांचे कामकाज पूर्णपणे बंद असणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारचा देखील समावेश आहे. आरबीआयद्वारे जाहिर केलेल्या सुट्ट्या सगळ्या सरकारी, खासगी, विदेशी आणि को-ऑपरेटिव्ह बँकांना देखील लागू आहेत. त्यामुळे तुम्हाला बँकेसंबंधीत काही महत्त्वाचे काम असल्यास ते जून महिन्याच्या सुट्ट्यापाहूनच उरकावे लागेल.

जून महिन्यात एकूण ९ दिवस बँकांच कामकाज बंद राहणार आहे. या ९ दिवसांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांकरता जाहिर केलेल्या सुट्ट्या आणि महिन्याच्या दुसरा, चौथा शनिवार आणि रविवारचा देखील समावेश आहे. यात जूनमध्ये कोणताही मोठा सण- उत्सव नाहीत. त्यामुळे साप्ताहिक सुट्टीशिवाय केवळ ३ स्थानिक उत्सव आहेत. परंतु हे त्या-त्या राज्यांनुसार साजरे होत असल्याने बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

- Advertisement -

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने २०२० वर्षाचे सुट्ट्यांचे कॅलेंडर (Bank Holidays 2020 Calender)जाहीर केले आहे. यावर RBI चे म्हणणे आहे की, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामुळे ग्राहकांना अपील केलं आहे की, बँकेशी संबंधित सगळी काम लवकरात लवकर उरकून घ्या. २०२१ या वर्षांचं बोलायचं झालं तर बँका ४० दिवस बंद राहणार आहे.

जून २०२१ मधील सुट्ट्यांची यादी

जून ६, २०२१ – रविवार

- Advertisement -

जून १२, २०२१ – दूसरा शनिवार

जून १३, २०२१- रविवार

जून १५, २०२१ – मिथुन संक्रांती व रज पर्व ( इजवाल-मिझोराम, भुवनेश्वरमध्ये बँका बंद राहतील.)

जून २०, २०२१ – रविवार

जून २५, २०२१ – गुरु हरगोविंदजी जयंती (जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद राहतील.)

जून २६, २०२१ – दुसरा शनिवार

जून २७, २०२१ – रविवार

जून ३०, २०२१ – रेमना नी (केवळ इजवालमध्ये बँक बंद राहिल. )


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका होणार कमी, देशात अँटीबॉडी कॉकटेल औषध लॉन्च

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -