घरताज्या घडामोडीBank Holiday: मे महिन्यात 'हे' आठ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या...

Bank Holiday: मे महिन्यात ‘हे’ आठ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या अधिक माहिती

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात बँकासंबंधी महत्त्वाच्या कामे अडकून राहू शकतात.

देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार ऑनलाईन सुरु आहेत. असे असले तरी काही महत्त्वाच्या कामांसाठी बँकेत जाणे गरजेचे असते. बँकेसंबंधी कोणतीही महत्त्वाची कामे असतील तर ती लगेच करुन घ्या. मे महिन्यात आठ दिवस बँका बंद असणार आहेत. आरबीआयच्या वेबसाइटनुसार,मे महिन्यात १२ दिवस बँका बंद असणार आहेत. त्यातील काही सुट्ट्या या आठवड्याच्या सुट्ट्या देखिल आहेत. मे महिन्यातील काही सुट्ट्या झाल्या आहेत. इथून पुढे आणखी आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात बँकासंबंधी महत्त्वाच्या कामे अडकून राहू शकतात. त्यामुळे बँकेसंदर्भातील कामे लवकरात लवकर उरकून घ्या.

मे महिन्यातील सुट्ट्यांचे आठ दिवस

  • ९ मे रोजी रविवार आल्याने राज्यातील सर्व बँकांना सुट्टी आहे.
  • १३ मे रोजी रमजान ईद आहे. या दिवशी मुंबई,नागपूर,बेलापूर, कोचीन,जम्मू,श्रीनगर,तिरुवनंतपुरम या ठिकाणी बँका बंद राहतील.
  • १४ मे रोजी रमजान ईद (ईद-उल-फितर) त्याचबरोबर अक्षय तृतीया व परशुराम जयंती देखिल साजरी करण्यात येते. या दिवशी मुंबई,नागपूर,बेलापूर, कोचीन,जम्मू,श्रीनगर,तिरुवनंतपुरम या ठिकाणी बँका बंद राहतील.
  • १६ मे रोजी रविवार असल्याने सर्व बँका बंद राहतील.
  • २२ मे रोजी बँकेचा चौथा शनिवार असल्याने राज्यातील सर्व बँकांना सुट्टी असेल.
  • २३ मे रविवार असल्याने सर्व बँका बंद राहतील.
  • २६ मे रोजी बौद्ध पौर्णिमा आहे. त्यामुळे मुंबई,नागपूर,बेलापूर, कोचीन,जम्मू,श्रीनगर त्याचबरोबर भोपाळ,चंदीगड,देहरादून,कानपूर,कोलकाता,लखनऊ या ठिकाणी बँका बंद राहतील. तसेच नवी दिल्ली,रायपूर,रांची शिमला या ठिकाणीही बँका बंद असणार आहेत.

आरबीआयच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकारनुसार, काही ठरावीक राज्याच्या ठराविक सुट्ट्या असतात. एखाद्या राज्यात साजरा केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सणादिवशी त्या राज्याला सुट्टी असते. इतर राज्यातील बँका त्या दिवशी सुरु असतात.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: रेल्वेने सात राज्यातील १७ स्टेशनवर तैनात केले कोविड डब्बे

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -