घरदेश-विदेशBank Holiday in August 2021: बँकशी संबंधीत काम लवकर उरका! ऑगस्टमध्ये तब्बल...

Bank Holiday in August 2021: बँकशी संबंधीत काम लवकर उरका! ऑगस्टमध्ये तब्बल १५ दिवस बँका राहणार बंद

Subscribe

ऑगस्ट महिन्यात जर बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास ते जुलै महिन्याच पूर्ण करा, कारण पुढील ऑगस्ट महिना हा बंपर हॉलिडे महिना आहे. त्यामुळे बँकेचे काम पुढे ढकललात तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. कारण ऑगस्ट महिन्यात विविध सणांमुळे तब्बल १५ सार्वजनिक सुट्ट्या आल्यात. या सुट्ट्यांमुळे बँकेच्या कामकाजावरही परिणाम होणार आहे. (bank holidays august 2021) रविवार, शनिवारची सुट्टी आणि सार्वजनिक सुट्ट्यां पकडून ऑगस्ट महिन्यात तब्बल १५ दिवस बँका बंद असणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात शनिवार आणि रविवारच्या आठवड्याच्या सुट्ट्या मिळून एकूण सात सुट्ट्या असतील. तसेच इतर काही सणांच्या सुट्ट्याही बँकांना मिळणार आहे. मात्र प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे.

- Advertisement -

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी

१) १ ऑगस्ट – रविवार

२) ८ ऑगस्ट – रविवार

- Advertisement -

३) १३ ऑगस्ट -पॅट्रिएट डे (इंफाळमध्ये बँका बंद)

४) १४ ऑगस्ट – दुसरा शनिार

५) १५ ऑगस्ट – रविवार

६) १६ ऑगस्ट – पारशी नववर्ष

७) १९ ऑगस्ट – मोहरम

८) २० ऑगस्ट – फर्स्ट ओणम

९) २१ ऑगस्ट- थिरुवोणम – (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)

१०) २२ ऑगस्ट – रविवार

११) २३ ऑगस्ट – श्री नारायण गुरू जयंत (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)

१२) २८ ऑगस्ट – चौथा शनिवार

१३) २९ ऑगस्ट – रविवार

१४) ३० ऑगस्ट- जन्माष्टमी

१५) ३१ ऑगस्ट – गोपाळ काला

एका महिन्यात तब्बल दोन वेळा लाँग विकेंड

ऑगस्ट महिन्यात तब्बल दोन वेळा तुम्हाला लाँग विकेंड मिळतो. पहिला म्हणजे १९ ते २३ ऑगस्ट आणि दुसरा २८ ते ३१ ऑगस्टदरम्यान. यामध्ये सलग ५ आणि ४ दिवस सुट्ट्या मिळत आहेत.

रिझर्व्ह बँकेने जाहिर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची अधिकृत लिंक 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी (Bank Holiday List) जारी केली जाते. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या वेबसाइटवरून तुम्ही सुट्ट्यांची यादी पाहू शकता. या वेबसाईटवर तुम्हाला प्रत्येक महिन्यात कोणत्या राज्यात बँकांना किती सुट्ट्या असतात याची माहिती दिलेली असते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -