Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Bank Holiday 2021: बँकेत जाताय? थोडी घाई करा, उरले काही तास

Bank Holiday 2021: बँकेत जाताय? थोडी घाई करा, उरले काही तास

Related Story

- Advertisement -

जर तुम्ही बँकेची महत्त्वाची कामे करायची असल्यात थोडी घाई करा, कारण बँक बंद व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवार, रविवार आणि होळी या सणामुळे गेली तीन दिवस बँका बंद होत्या. मात्र तीन दिवसांनंतर बँका आज सुरु झाल्या आहेत. मात्र आज एकच दिवस बँक सुरु राहणार आहे. त्यामुळे बँकांसंदर्भात तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर आजचं करा. कारण पुढील तीन दिवस बँका पून्हा बंद राहणार आहेत. ३१ मार्चला बँकांचा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो त्यामुळे बँका बंद राहणार आहे. तर १ एप्रिल २०२१ बँकांचे लेखा सादर करण्याचा आणि २ एप्रिल २०२१ गुड फ्राइडे असल्याने बँक राहणार आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवस बँक बंद राहिल्याने नागरिकांना बँकांची कामे करण्यात अडचणी येणार आहेत.

२७ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान बँकांना सुट्टी असल्याने बँकिंग सेवांवर परिणाम जाणवत आहे. मार्च हे आर्थिक वर्ष असल्याने बँकांच्या कामकाजासाठी मार्च महिना महत्वाचा असतो. पण मार्चअखेरीस होळी, शनिवार, रविवार आणि बँकांच्या वर्षाचा आर्थिक हिशेब करण्यास बँका बंद होत्या. त्यामुळे २७ मार्चपासून ४ मार्चपर्यंत ७ दिवस बँका बंद असून यादिवसात फक्त आजचा दिवस बँकेचे कामकाज सुरू राहणार आहे. यापार्श्वभूमीवर शनिवारपासून देशभरातील खासगी आणि सरकारी बँका बंद राहणार आहे. जर तुम्ही आज आपले बँकांचे कामकाज पूर्ण केले नाही तर तुम्हाला थेट ३ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisement -

आरबीआयने बँकांसाठी सुट्टीचे वेळापत्रक देखील जाहीर केलं आहे. ३० मार्च रोजी पाटणा शहर वगळण्यात आले असून इतर ठिकाणी बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. यासह ३० मार्च रोजी मार्च अखेरचा दिवस तर ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस तसेच सार्वजनिक व्यवहार बंद असल्याने बँका बंद राहणार आहेत. तर १ एप्रिलला बँकांचे लेखा-जोखाचा दिवस, २ एप्रिल दिवशी गुड फ्रायडे तर ४ एप्रिल रोजी रविवार असल्याने सरकारी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग कॅलेंडरनुसार ४ एप्रिल दरम्यान केवळ आजचा दिवसचं बँकांचे कामकाज राहणार आहे.

४ एप्रिल या कालावधीचे संपूर्ण वेळापत्रक पहा 

३१ मार्च २०२१ – आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस
१ एप्रिल २०२१ – बँकांचे लेखा
२ एप्रिल २०२१ – गुड फ्राइडे
३ एप्रिल २०२१ – सर्व बँका खुल्या राहतील
४ एप्रिल २०२१ – रविवार


- Advertisement -

 

- Advertisement -