April Bank Holiday 2022 : एप्रिल महिन्यात ‘या’ तारखांना बँका राहणार बंद; वेळीच पूर्ण करा ही कामं

bank holidays in august

एप्रिल महिना संपण्यासाठी अवघा एक आठवडा शिल्लक आहे. नव आर्थिक वर्ष देखील 1 एप्रिलपासून सुरु होत आहे. मात्र मार्च महिन्याप्रमाणेच एप्रिल महिन्यात देखील १५ दिवस बँका बंद असणार आहे. त्यामुळे बँकांमधील तुमची महत्त्वाची काम लवकरात लवकर उरून घ्या. एप्रिल महिन्यात बँका नेमक्या किती दिवस बंद राहणार आहेत ते जाणून घेऊ….

देशातील मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑउ इंडियाकडून वर्षाच्या सुरुवातीलाच विविध राज्यात बँकांना महिन्यात किती दिवस सुट्ट्या असणार आहेत याची यादी जाहीर केली जाते. या यादीनुसार एप्रिल महिन्यात देशभरातील बँका जवळपास 15 दिवस बंद असणार आहेत. मात्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये या या सुट्ट्यांचे नियोजन मर्यादीत असते.

एप्रिल महिन्यात नेमक्या किती दिवस बँका बंद

१ एप्रिल – वार्षिक क्लोजिंग दिवस. ( या दिवशी देशातील सर्वच बँका राहणार बंद)

२ एप्रिल – गुढीपाडवा (शनिवार)

३ एप्रिल – रविवार

४ एप्रिल – सरहुल  (रांची आणि झारखंडमधील बँकांना सुट्टी)

५ एप्रिल – बाबू जगजीवन राम यांची जंयती (तेलंगना आणि हैदराबादमधील बँकांना सुट्टी)

९ एप्रिल – दुसरा शनिवार

१० एप्रिल – रविवार

१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

१५ एप्रिल – गुड फ्राइडे, बंगाली नववर्ष आणि हिमाचल दिवस

१७ एप्रिल – रविवार

२१ एप्रिल – गडिया पूजा (अगरताळा आणि आसपासच्या प्रदेशातील बँकांना सुट्टी)

२३ एप्रिल –चौथा शनिवार

२४ एप्रिल – रविवार

२९ एप्रिल- शब ई कद्र, जुमात उल विदाच्या निमित्ताने बँकांना सुट्टी


नोटबंदी, 258 किलो सोने आणि श्रीधर पाटणकर; नेमका घोटाळा काय?