घरट्रेंडिंगBank Holidays 2022: वर्ष 2022मध्ये 'या' दिवशी बँकांना सुट्टी ! पहा वर्षभरातील...

Bank Holidays 2022: वर्ष 2022मध्ये ‘या’ दिवशी बँकांना सुट्टी ! पहा वर्षभरातील सुट्ट्यांचे वेळापत्रक

Subscribe

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र दिन आणि माहात्मा गांधी जयंती या तीन सुट्ट्यांचा समावेश राष्ट्रीय सुट्ट्यांमध्ये आहे. त्यामुळे 2022वर्षात बँकासंदर्भातील कामासाठी घराबाहेर पडण्यासाठी बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहणे गरजेचे आहे.

या वर्षी म्हणजे 2022मध्ये देशातील विविध राज्यातील बँका अनेक दिवस बंद राहतील (Bank Holidays 2022)  बँकांच्या सुट्ट्यांमध्ये नॅशनल हॉलिडे आणि केंद्र तसेच राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र दिन आणि माहात्मा गांधी जयंती या तीन सुट्ट्यांचा समावेश राष्ट्रीय सुट्ट्यांमध्ये आहे. त्यामुळे 2022वर्षात बँकासंदर्भातील कामासाठी घराबाहेर पडण्यासाठी बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त 2022मध्ये कोणत्या दिवशी देशातील बँका बंद राहणार आहेत याचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.

जानेवारी

  • 1 जानेवारी – आयजोल, चेन्नई, गंगटोक आणि इंफाळ मधील बँका बंद
  • 3 जानेवारी – आयजोल आणि गंगटोक येथील बँका बंद
  • 4 जानेवारी – लोसूंग- गंगटोकमधील बँका बंद
  • 11 जानेवारी – मिशनरी डे
  • 12 जानेवारी – स्वामी विवेकानंद दिवस
  • 14 जानेवारी – मकर संक्राती / पोंगल
  • 18 थाई पूसम
  • 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन

जानेवारीत 2, 9,16,23,30 जानेवारी रोजी रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल. तसेच 8 आणि 22 जानेवारी रोजी पहिला दूसरा आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असणार आहेत.

- Advertisement -

फेब्रुवारी

  • 2 फेब्रुवारी – सोनम लोछर
  • 5 फेब्रुवारी – सरस्वती पूजा / वसंत पंचमी
  • 15फेब्रुवारी – मोहम्मद हजरत अली वाढदिवस
  • 18 फेब्रुवारी – डोली यात्रा कोलकत्ता
  • 19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती

फेब्रुवारी महिन्यात 6, 13 आणि 27 फेब्रुवारी रोजी रविवारी साप्तहिक सुट्टी असेल. तर 12 आणि 26 फेब्रुवारीला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल.

मार्च

  • 1 मार्च – महाशिवरात्री
  • 4 मार्च – चपाचार कुट
  • 17 मार्च – होलिका दहन
  • 18 मार्च – धुलिवंदन
  • 22 मार्च – बिहार दिवस

मार्च महिन्यात 6,13, 20 आणि 27 मार्चला रविवार साप्ताहिक सुट्टी असेल. तर 12 आणि 26 मार्चला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल.

- Advertisement -

एप्रिल

  • 1 एप्रिल – सर्व बँकांना सुट्टी
  • 2 एप्रिल – गुढी पाडवा
  • 4 एप्रिल – सरिहुल
  • 5 एप्रिल – बाबू जगजीवनदास राम जन्मदिवस
  • 14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
  • 15 एप्रिल – गुड फ्राइडे
  • 16 एप्रिल – बोहाग बिहू
  • 21 एप्रिल – गडीया पूजा
  • 29 एप्रिल – शब-ई-कद्र/ जुमात-उल-विदा

एप्रिल महिन्यात 3,10 17 आणि 24एप्रिल ला साप्ताहीक सुट्टी आहे. तर 9आणि 23 एप्रिलला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल.

मे

  • 2 मे – रमजान ईद
  • 9 मे – रवींद्रनाथ टागोर जयंती
  • 16 मे बुद्ध पौर्णिमा

मे महिन्यात 1,8,15 आणि 22 मे रोजी साप्ताहिक सुट्टी असेल. तर 14 आणि 28 मेला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल.

जून

  • 2 जून – महाराणा प्रताप जयंती
  • 15 जून – वाईएमए डे / गुरु हरगोविंद जन्मदिवस

जून महिन्यात 5,12,19,26 जून रोजी साप्ताहिक सुट्टी असेल. तर 11 आणि 25 जूनला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल.

 

जुलै

  • 1 जुलै – कांग यात्रा
  • 9 जुलै – बकरी ईद
  • 11 जुलै – ईज-उल-अजा
  • 13 जुलै – भानू जयंती
  • 14 जुलै – बेन डिएनखलाम
  • 16 जुलै – हरेला (देहरादून )
  • 26 जुलै – केर पूजा

जुलै महिन्यात 3,10,17,31 जुलै रोजी साप्ताहिक सुट्टी असेल. तर 9 आणि 23 जुलैला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल.

 

ऑगस्ट

  • 1 ऑगस्ट – द्रुपका शे-जी
  • 8ऑगस्ट – मोहरम
  • 11 ऑगस्ट – रक्षाबंधन
  • 15 ऑगस्ट – स्वातंत्र दिवस
  • 16 ऑगस्ट – पारसी नववर्ष
  • 19 ऑगस्ट – जन्माष्मी
  • 20 ऑगस्ट – दहीहंडी

ऑगस्ट महिन्यात 7,14,21, रोजी साप्ताहिक सुट्टी असेल. तर 13आणि 28 ऑगस्टला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल.

 

सप्टेंबर

  • 1 सप्टेंबर – गणेश चतुर्थी
  • 7 सप्टेंबर – पहिला ओणम
  • 9 सप्टेंबर – इंद्र यात्रा
  • 21 सप्टेंबर – श्री नरवण गुरू समाधी दिवस
  • 26 सप्टेंबर नवरात्री

सप्टेंबर महिन्यात 4,17,25 रोजी साप्ताहिक सुट्टी असेल. तर 11 आणि 24 सप्टेंबरला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल.

ऑक्टोबर

  • 3 ऑक्टोबर – दुर्गा पूजा
  • 4 ऑक्टोबर – दसरा
  • 6 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (दशैन)
  • 13 ऑक्टोबर – करवा चौथ
  • 14 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद-उल-नबी
  • 24 ऑक्टोबर – लक्ष्मी पूजन
  • 26 ऑक्टोबर – भाऊबिज

ऑक्टोबर महिन्यात 2,9,16,30 रोजी साप्ताहिक सुट्टी असेल. तर 22 ऑक्टोबरला चौथ्या शनिवारी सुट्टी असेल.

 

नोव्हेंबर

  • 1 नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव
  • 8 नोव्हेंबर – गुरुनानक जयंती
  • 11 नोव्हेंबर – कनकदासा जयंती
  • 23 नोव्हेंबर – सेंग कुत्सनेम

नोव्हेंबर महिन्यात 6,13,20 नोव्हेंबर रोजी साप्ताहिक सुट्टी असेल. तर 12 आणि 26 सप्टेंबरला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल.

 

डिसेंबर

  • 3 डिसेंबर – संत फ्रांसिस जेवियर
  • 19 डिसेंबर – गोवा मुक्ती दिवस
  • 26 डिसेंबर ख्रिसमस
  • 29 डिसेंबर – गुरू गोविंद सिंह जन्मदिव

डिसेंबर महिन्यात 4,11,18,25 डिसेंबर रोजी साप्ताहिक सुट्टी असेल. तर 10 आणि 24 सप्टेंबरला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल.


हेही वाचा – Indian billionaires : कोरोना काळात भारतात अब्जाधीशांची संपत्ती दुप्पट, नव्या अब्जाधीशांचीही भर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -