घरअर्थजगतBank Holiday: बँकेत जाताय मग जरा थांबा, कारण आजपासून बँका ४ दिवस...

Bank Holiday: बँकेत जाताय मग जरा थांबा, कारण आजपासून बँका ४ दिवस राहणार बंद

Subscribe

बँकासंबंधीत कामं करण्यासाठी तुम्ही आज बँकेत जाणार असाल तर जरा थांबा, कारण आजपासून पुढील ४ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांसंबंधीत महत्वाची कामं करण्यासाठी तुम्हाला अजून चार दिवस वाट पाहावी लागेल. मात्र ऑनलाईन बँकिंग सर्विस आणि एटीएम सेवा सुरु राहिल. या बँकांच्या सुट्ट्या एकाच वेळी सर्व राज्यांना लागू असणार नाहीत. त्या-त्या राज्यातील स्थानिक सण लक्षात घेत रिझर्व्ह बँकेने त्यासंबंधीत राज्यांसाठी सुट्ट्यांची लिस्ट जाहीर केली आहे. या महिन्यात मोहरम आणि कृष्ण जन्माष्टमी या दोन सणानिमित्त असणाऱ्या सुट्ट्यांमुळे सर्वाधिक राज्यांमधील बँका बंद असतील.

मुंबईसह ‘या’ शहरांमध्ये आज बँकांना सुट्टी

मोहरम सणानिमित्त आज १९ ऑगस्ट २०२१ (गुरुवार) बँकांचे कामकाज पूर्णपणे बंद असणार आहे. यामुळे १७ शहारांतील बँका बंद राहतील. यात अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपुर, जम्मू, कानपूर, कोलकत्ता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपुर, रांची आणि श्रीनगरचा समावेश आहे.

- Advertisement -

तर शुक्रवारी ‘या’ राज्यांतील बँका राहणार बंद

ओणम सणानिमित्त कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये शुक्रवारी बँका बंद असतील. यामुळे या राज्यांतील बँकांमध्ये शुक्रवारी कोणतेही कामकाज सुरु राहणार नाहीत.

महिन्यातील तिसऱ्या शनिवारी ‘या’ राज्यातील बँका बंद

तिरुवोनम सणानिमित्त २१ ऑगस्ट रोजी (शनिवारी) केरळमधील बँका बंद असतील.

- Advertisement -

२२ ऑगस्टला रविवारची सुट्टी

आठवड्याच्या प्रत्येक रविवारी देशातील सर्व बँका बंद असतात. रविवारशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांचे कामकाज बंदचं असते. यामुळे २२ ऑगस्टला रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. याच दिवशी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे.

बँकांसंबंधी ‘ही’ महत्त्वाची कामे रखडणार 

आजकाल डिजिटल बँकिंगमुळे बँकांसंबंधीत काही कामे सहज होऊन जातात. परंतु पासबुक अपडेट, केवाईसी अपडेट, चेक क्लिअरिंग सारखी कामं करण्यात अडचणी येतात. तसेच लोन घेण्यासंबंधीत अनेक कामे करण्यासाठी अडचणी येतात. कारण काही बँकांमध्ये लोनसंबंधीत व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंटेशनची काम ऑफलाइन पद्धतीनेच होतात.


स्मृती इराणी यांचा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन लूक पाहून नेटकरी हैराण, “जुन्या स्मृतीबेन परतल्या”

 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -