घरदेश-विदेशBank Holidays Complete List March 2021: मार्चमध्ये बँकांना ११ दिवस सुट्टी

Bank Holidays Complete List March 2021: मार्चमध्ये बँकांना ११ दिवस सुट्टी

Subscribe

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) हॉलिडे कॅलेंडरमधील माहिती

फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अवघे काही शिल्लक असताना मार्चमधील सुट्ट्यांची यादी जाहिर झाली आहे. त्यामुळे मार्चमध्ये जर तुमची बँकेसंदर्भातील महत्वाची कामे करायची असल्यास लवकरचं आटपून घ्या. कारण मार्चमध्ये ११ दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. या सुट्ट्याचे वेळापत्रक प्रत्येक राज्याप्रमाणे वेगळे आहे. त्यामुळे नागरिकांनी बँकेचे काम करण्यासाठी घराबाहेर पडता कॅलेंडर पाहून बाहेर पडावे. मुंबईसह महाराष्ट्रात ९ दिवस बँकांचे काम बंद असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) हॉलिडे कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण 11 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. यापैकी 5 मार्च, 11 मार्च, 22 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च रोजी बँकांना सुट्टी असेल. त्याशिवाय 4 रविवार आणि 2 शनिवारीही बँका बंद राहतील. म्हणजेच मार्चमध्ये एकूण 11 दिवस बँकांमध्ये काम पूर्ण बंद राहणार आहे.

मार्च 2021 मध्ये बँकांना असलेल्या सुट्ट्या

5 मार्च, शुक्रवार, फक्त मिझोरममध्ये सुट्टी
7 मार्च, रविवार
11 मार्च, गुरुवार, महाशिवरात्री
13 मार्च, दुसरा शनिवार
14 मार्च, रविवार
21 मार्च, रविवार
22 मार्च, सोमवार, बिहार दिन, फक्त बिहारमध्ये सुटी
27 मार्च, चौथा शनिवार
28 मार्च, रविवार, होळी
29 मार्च, सोमवार, धूलिवंदन
30 मार्च, मंगळवार, राजस्थान दिवस

- Advertisement -

यातील ७ मार्च रविवार, 11 मार्च गुरुवार महाशिवरात्री, 13 मार्च दुसरा शनिवार, 14 मार्च रविवार, 21 मार्च रविवार, 27 मार्च चौथा शनिवार, 28 मार्च रविवार होळी, 29 मार्च सोमवार धूलिवंदन अशा एकूण ९ दिवस राज्यात बँका बंद राहतील. त्यामुळे मार्चमधील कामे पटापट आटपून घ्या.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -