घरट्रेंडिंगमहत्त्वाची बातमी! जुलैमध्ये किती दिवस बँका असणार बंद! पहा RBI ची ऑफिशियल...

महत्त्वाची बातमी! जुलैमध्ये किती दिवस बँका असणार बंद! पहा RBI ची ऑफिशियल Holiday List

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने लॉकडाऊन मधील निर्बंध आता शिथील करण्यात य़ेत आहेत. कोविड १९ ची दुसरी लाट आता नियंत्रणात असल्याने व्यवसाय, दैनंदिन व्यवहारही वाढले आहेत. राज्यांमध्येही अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बँकांचे कामकाज देखील दिवसभर सुरू झाले आहे. म्हणजेच सर्वच परिस्थिती आता सामान्य होताना दिसतेय. अशा परिस्थितीत बँकांना किती दिवस सुट्ट्या असतील म्हणजेच येत्या महिन्यात किती दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे, यासंदर्भात जाणून घ्या.

जुलै २०२१ मध्ये जर तुम्ही बँकेशी संबंधित काही मोठे काम करण्याचे ठरवले असेल तर एकदा सुट्टीची यादी देखील तपासून त्यानुसार तुमचे नियोजन करा. जुलै २०२१ मध्ये, बँकेना एकूण ९ अतिरिक्त सुट्टी मिळणार आहे. या सुट्ट्यांमध्ये केवळ काही सुट्ट्या कॉमन असतील म्हणजेच देशभरात एकाच वेळी बँकांना सुट्टी असून बंद राहणार आहे. काही सुट्ट्या राज्यनिहाय असतात. याशिवाय शनिवार व रविवारी ६ दिवस बँक बंद राहतील. म्हणजेच, साधारण १५ दिवस सुट्टी असणार आहे.  त्याचबरोबर बँक हॉलिडे कॅलेंडरनुसार २५ आणि ३० जून रोजी निवडक शहरांत जूनमध्ये उरलेले दिवस बँक बंद असतील. २५ जून रोजी जम्मू आणि श्रीनगर येथे बँक बंद राहणार आहे तर ३० जून रोजी ऐजवळमध्येही (Aizwal) सुट्टी असून याशिवाय शनिवार व रविवारी नेहमी प्रमाणे बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.

जुलैमध्ये अशा असतील बँकांना सुट्या

  • १२ जुलै २०२१ – सोमवार – रथ यात्रा (ओरिसा)
  • १३ जुलै २०२१ – मंगळवार – शहीद दिवस / भानु जयंती (शहीद दिन- जम्मू-काश्मीर, भानु जयंती- सिक्कीम)
  • १४ जुलै २०२१ – बुधवार, द्रुकपा श्शेची (गंगटोक)
  • १६ जुलै २०२१ – शुक्रवार – हरेला (देहरादून)
  • १७ जुलै २०२१ – शनिवार- खर्ची पूजा (मेघालय)
  • १९ जुलै २०२१ – सोमवार- गुरू रिम्पोचे थुंगकर त्सेचू (गंगटोक)
  • २० जुलै २०२१ – मंगळवार – बकरी ईद (जम्मू-कोची)
  • २१ जुलै २०२१ – बुधवार – बकरी ईद (देशात)
  • ३१ जुलै २०२१ – शनिवार – केर पूजा (अगरतला)

Vaccine: २ वर्षांवरील मुलांना ‘या’ महिन्यात मिळणार covaxin लस, AIIMSच्या डॉक्टरांची माहिती

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -