June Bank Holiday 2022 : जूनमध्ये बँका 12 दिवस राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी

तुम्हाला बँकांच्या सुट्ट्यांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही RBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण यादी पाहू शकता.

bank holidays june 2022 branches will close 12 days in this month check datewise rbi list here
June Bank Holiday 2022 : जूनमध्ये बँका 12 दिवस राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी

जून महिना सुरु झाल्याने तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारातील अनेक नवे बदल अंमलात येत आहेत. यासोबत रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादीही जाहीर केली आहे. यावेळी जूनमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थिती तुम्ही बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर या महिन्यांच्या सुटट्यांची यादी पाहून जाल. (Bank Closed)

आरबीआयने जारी केलेल्या चार्टनुसार, जूनमध्ये आठवड्यातील शनिवार, रविवार अशा सार्वजनिक सुट्ट्या वगळता आणखी 6 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या केवळ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाच नाही तर खाजगी, परदेशी, सहकारी आणि प्रादेशिक बँकांनाही लागू असतील. ही सुट्ट्यांची यादी सर्व राज्यांतील सर्व बँकांना सारखीच लागू असते. मात्र काही सुट्ट्या विशेषत: एक किंवा अधिक राज्यांमध्येच लागू होतात. हेच नियम या महिन्यातही लागू होतील. (Rbi Bank Holiday List)

शनिवार- रविवारच्या सुट्ट्या

जूनमध्ये एकूण चार रविवार आणि दोन शनिवार आहेत. बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात, यामुळे जूनमध्ये रविवार आणि शनिवारी फक्त 6 सुटट्या मिळणार आहेत. या महिन्यात 5 जूनला रविवार, 11 जूनला दुसरा शनिवार, 12 जूनला रविवार, 19 जूनला पुन्हा रविवार, 25 जूनला चौथा शनिवार आणि 26 जूनला रविवार असल्याने सुट्टी असे. (Bank Holidays June 2022)

इतर सुट्ट्यांच्या दिवशीही 6 दिवस बँका बंद

2 जून 2022 – महाराणा प्रताप जयंती, तेलंगणा स्थापना दिवस ( हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, तेलंगणामध्ये राहणार बँका बंद )

3 जून 2022 – श्रीगुरु अर्जुन देवजींचा हुतात्मा दिवस (फक्त पंजाबमध्ये बँका बंद)

14 जून 2022 – संत गुरू कबीर जयंती (हिमाचल प्रदेश, चंदीगड, हरियाणा, पंजाब आणि ओडिशामध्ये बँका बंद )

15 जून 2022 – राजा संक्रांती आणि गुरु हरगोविंदजी जन्मदिवस ( ओडिशा, मिझोराम, जम्मू-काश्मीरमध्ये बँका बंद)

16 जून 2022 – खारची पूजा ( त्रिपुरामध्ये बँका बंद)

30 जून 2022 – रेमना नी सण ( फक्त मिझोरममध्ये बँका बंद)

तुम्हाला बँकांच्या सुट्ट्यांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही RBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण यादी पाहू शकता. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx वर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या आणि प्रत्येक राज्याच्या बँक सुट्ट्यांची माहिती मिळेल.


June Rules Change : 1 जून 2022 पासून बदलणार ‘हे’ 5 नियम; तुमच्या खिश्यावर होणार परिणाम