Bank Holidays October : नवरात्रोत्सवात देशात १७ दिवस बँका बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

Bank Holidays October 2021: Banks to remain closed for 17 days Check full list
Bank Holidays October : नवरात्रोत्सवात देशात १७ दिवस बँका बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

देशभरात गुरुवारपासून म्हणजे ७ ऑक्टोबर २०२१ पासून नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. मात्र नवरात्रोत्सवानिमित्त विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँका बंद असणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबरपासून देशभरात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी १७ दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी तुम्ही ही सुट्ट्यांची यादी पाहून जा. या १७ दिवसांच्या सुट्ट्यांपैकी १३ दिवस आरबीआयने सु्ट्ट्या दिल्या आहेत. यात ९ ऑक्टोबरला शनिवार आणि १० ऑक्टोबरला रविवार असल्याने देशभरातील बँका बंद असतील.

ऑक्टोबर २०२१ मध्ये ‘या’ दिवशी राहणार बँका बंद

१) १२ ऑक्टोबर- दुर्गापूजा महासप्तमीमुळे आगरतळा आणि कोलकत्तामध्ये बँका बंद राहतील.

२) १३ ऑक्टोबर – दुर्गापूजा महाअष्टमीमुळे आगरतळा, कोलकाता, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, पाटणा आणि रांची येथे बँका बंद राहतील.

३) १४ ऑक्टोबर – आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, लखनऊ, शिलाँग, श्रीनगर, तिरुअनंतपुरम, पाटणा आणि रांची येथे बँक सुट्टी असेल.

४) १५ ऑक्टोबर – दसऱ्याला देशभरातील बँका बंद राहतील. मात्र इम्फाळ आणि सिमल्यात बँकांमध्ये काम चालू राहिल.

५) १६ ऑक्टोबर – गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.

६) १७ ऑक्टोबर- रविवारच्या सुट्टीमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असतील.

७) १८ ऑक्टोबर – गुवाहाटीच्या बँका बंद राहतील.

८) १९ ऑक्टोबर- ईद-ए-मिलादनिमित्त बँका बंद राहतील. अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, इंफाल, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथील बँका या दिवशी बंद राहतील.

९) २० ऑक्टोबर – महर्षी वाल्मिकी जयंतीला आगरतळा, बेंगळुरू, चंदीगड, कोलकाता आणि शिमला येथील बँका बंद राहतील.

१०) २२ ऑक्टोबर- ईद-ए-मिलाद नंतर पहिला जुम्मा असल्याने जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकेला सुट्टी असेल.

११) २३ ऑक्टोबर- चौथा शनिवार असल्याने बँका बंद असतील.

१२) २४ ऑक्टोबर- रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.

१३) २६ ऑक्टोबर – जम्मू-श्रीनगरमध्येही बँका बंद राहतील.

१४) ३१ ऑक्टोबर – रविवारच्या सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.