घरदेश-विदेशबँकांकडून लोन हवे आहे, मग 'या' पाच गोष्टी करा

बँकांकडून लोन हवे आहे, मग ‘या’ पाच गोष्टी करा

Subscribe

कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवलाची गरज असते. लोन मागण्यापूर्वी या प्रक्रिया पूर्ण केल्यावर बँकेकडून लोन सहज मिळेल.

व्यवसाय सुरु करायचा असेल तर भांडवलाची आवश्यकता असते. भांडवल हे व्यवसायासाठी महत्वाची गोष्ट आहे. बिना भांडवल कोणताही व्यवसाय केला जाऊ शकत नाही. भांडवल मिळाले नाही म्हणून अनेकांचे व्यवसायचे स्वप्न हे स्वप्नच राहते. अनेकदा अपूऱ्या कागदपत्रांमुळे बँक ही लोन साठी केलेला अर्ज रद्द करतो. बँकांकडून लोन मिळवण्यासाठी अनेक कागदपत्रांची गरज लागते. व्यवसाय सुरु करायचा असल्यास त्याचा प्लान, पूर्व नियोजन आणि लागणारा खर्च या बाबत बँकेला माहिती देणे गरजे आहे. अनेकदा कागदपत्र असूनही बँक लोनचा अर्ज रद्द करते. बँकेला पूर्णखात्री आल्यावरच बँक लोन देते. पुढील प्रक्रियांमुळे बँकेचे लोन काढण्यास मदत मिळू शकेल.

बिझनेस योजना बनवा

बँकेत लोन साठी अर्ज करण्यापूर्वी बिझनेस बद्दल आखलेली योजना ही स्पष्टिकरणासहित बँकेसमोर सादर करावी. बिझनेस प्लानमध्ये भांडवल आणि नफ्या बद्दल माहिती द्यावी. बिझनेस कशा संदर्भात असेल आणि केल्यावर किती नफा मिळेल या बद्दलची माहिती द्यावी.

- Advertisement -

आवश्यक गोष्टींची यादी

बिझनेससाठी लागणाऱ्या सामग्रीची एक यादी बनवा. बिझनेससाठी लागणाऱ्या वस्तूंची माहिती यामध्ये लिहा. त्यावस्तूंची किंमत, इतर खर्च आणि अंदाजे खर्च याची तपशील माहिती लिहा. ही वस्तू किती काळासाठी घेत आहात याचीही माहिती लिहा.

तज्ञांची मदत घ्या

जागेचे दर किंवा इतर खर्चांसाठी तज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. जर यापूर्वीही स्वतःचा व्यवसाय असेल तर मागील व्यवसातून मिळलेला नफा हा चार्टड अकाऊंटंट किंवा व्यवसायीक वकीलांकडून तपासून घ्या.

- Advertisement -

तज्ञांच्या मदतीने कागदपत्रे बनवा

बिझनेससाठी लागणाऱ्या वस्तूंचा बाजर भाव किंवा इतर खर्च याची कागदपत्रे तज्ञांच्या मदतीने बनवून घ्या. ही कागदपत्रे लोनच्या अर्जाबरोबर बँकेला देणे आवश्यक आहे.

योग्य बँकेत जा

बँकांची एक यादी बनवा. यातील जवळच्या बँका कोणत्या आहे त्या निवडा. ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या बँकेला प्राधान्य द्या. बँक खाते असल्यामुळे तुमच्या खात्याचा रेकॉर्ड त्यांच्या जवळ असतो. त्यामुळे लोन मिळण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -