घरदेश-विदेशSunday No Bank Holiday: 31 मार्च रविवारी बँका राहणार सुरू; RBI चे...

Sunday No Bank Holiday: 31 मार्च रविवारी बँका राहणार सुरू; RBI चे आदेश

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशातील सर्व बँकांना 31 मार्च 2024 रोजी सरकारी कामासाठी त्यांच्या शाखा उघडण्याचे निर्देश दिले आहेत

नवी दिल्ली:भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशातील सर्व बँकांना 31 मार्च 2024 रोजी सरकारी कामासाठी त्यांच्या शाखा उघडण्याचे निर्देश दिले आहेत. 31 मार्च या दिवशी रविवार असून चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. (Bank News Banks will remain open despite March 31 being a Sunday Orders of RBI)

भारत सरकारने सरकारी पावत्या आणि पेमेंटशी संबंधित बँकांच्या सर्व शाखा 31 मार्च 2024 (रविवार) रोजी व्यवहारांसाठी खुल्या ठेवण्याची विनंती केली आहे. जेणेकरून चालू आर्थिक वर्षातील सर्व कामकाज पूर्ण करता येईल, असं आरबीआयने निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे, एजन्सी बँकांना 31 मार्च 2024 (रविवार) रोजी सरकारी व्यवसायाशी संबंधित त्यांच्या सर्व शाखा खुल्या ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

- Advertisement -

सलग तीन दिवस बँका राहणार बंद

25 मार्चला होळीनिमित्त जवळपास सर्वच राज्यातील बँकांना सुट्टी असेल. याआधी, या रविवारी म्हणजेच 24 मार्च रोजी साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद राहतील. शनिवार 23 मार्च हा चौथा शनिवार आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी असेल. बिहारमध्ये २२ मार्च रोजी बँका बंद राहतील. बिहार दिनानिमित्त या दिवशी बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही.

पाटणामध्ये 26 आणि 27 तारखेलाही बँका बंद

भुवनेश्वर आणि इंफाळमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी 26 मार्चला सुट्टी असेल. रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार पाटणामध्ये 26 आणि 27 तारखेला बँका बंद राहतील. यानंतर गुड फ्रायडेनिमित्त 29 मार्च रोजी देशभरातील बँका बंद राहतील.

- Advertisement -

एप्रिलमध्ये या दिवशी बंद

1 एप्रिल रोजी देशभरातील बँका बंद राहणार आहेत. त्याचबरोबर बाबू जगजीवन राम जयंती/जुमात-उल-विदानिमित्त 5 एप्रिल रोजी बँकांना सुट्टी असेल. 9 एप्रिल हा नवरात्रीचा पहिला दिवस. हा दिवस गुढी पाडवा/उगादी सण/तेलुगु नववर्ष दिवस/साजीबू नोंगमापनबा (चेराओबा) देखील आहे. त्यामुळे 9 एप्रिल रोजी बँका बंद राहणार आहेत.

11 एप्रिलला ईदची सुट्टी

आरबीआय कॅलेंडरनुसार, बोहाग बिहू/चेराओबा/बैसाखी/बिजू सणानिमित्त 13 एप्रिल रोजी बँका बंद राहतील. याशिवाय 15 तारखेला बोहाग बिहू/हिमाचल दिन आणि 17 एप्रिलला रामनवमीच्या निमित्ताने बँका बंद राहतील. काही ठिकाणी 20 एप्रिल रोजी गरिया पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

(हेही वाचा: HC Order: सासू-सासऱ्यांच्या मानसिक शांतीसाठी सुनेला बेघर करता येणार नाही – मुंबई उच्च न्यायालय )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -