घरअर्थजगतबँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना झटका, बचत खात्यावरील व्याजदरात कपात

बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना झटका, बचत खात्यावरील व्याजदरात कपात

Subscribe

बँकेच्या वेबसाईटनुसार, जर एखाद्या बचत खातेधारकाच्या बँक खात्यात 1 लाख रुपयांपर्यंत शिल्लक असेल तर त्याला आता केवळ 2.75 टक्के वार्षिक व्याज मिळेल. त्याच वेळी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त शिल्लक असल्यास 2.90 टक्के वार्षिक व्याज दिले जाईल.

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. बँकेने आपल्या बचत खाते आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केलीय. BOI ने बचत खात्यावरील व्याजदरात 0.15 टक्के कपात केली. बँकेने बचत खात्यातील 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे, तर बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. बँकेचे नवीन दर 1 मे 2022 पासून लागू झाले आहेत.

बचत खात्यावरील व्याजदरात 0.15 टक्के कपात

बँकेच्या वेबसाईटनुसार, जर एखाद्या बचत खातेधारकाच्या बँक खात्यात 1 लाख रुपयांपर्यंत शिल्लक असेल तर त्याला आता केवळ 2.75 टक्के वार्षिक व्याज मिळेल. त्याच वेळी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त शिल्लक असल्यास 2.90 टक्के वार्षिक व्याज दिले जाईल. 1 लाख रुपयांपर्यंत शिल्लक असल्यास व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. 1 लाखापेक्षा जास्त शिल्लक असलेल्या व्याजदरात कोणतीही कपात नाही.

- Advertisement -

बँक ऑफ इंडियाचे नवीन एफडी दर

बँक आता 7 ते 45 दिवसांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर 2.85 टक्के व्याजदर देईल. बँक 46 दिवस ते 90 दिवस आणि 91 दिवस ते 179 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 3.85 टक्के व्याज देईल. 180 दिवसांपासून ते 269 दिवस आणि 270 दिवसांपर्यंत एका वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर आता बँक ऑफ इंडियाकडून 4.35 टक्के व्याज मिळेल. 1 वर्ष आणि त्याहून अधिक मुदतीच्या परंतु 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या रुपयांच्या FD वरील व्याजदर 5.00 टक्के असेल, तर 2 वर्षे आणि त्याहून अधिक परंतु 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी व्याजदर 5.20 टक्के असेल.


हेही वाचाः बेअंत सिंग हत्या प्रकरणातील आरोपी बलवंत सिंग राजोआनांच्या दयेच्या अर्जावर 2 महिन्यांत निर्णय घ्या; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -