घरताज्या घडामोडीBank Job: स्पोर्ट्स कोटासाठी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी

Bank Job: स्पोर्ट्स कोटासाठी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी

Subscribe

बँक ऑफ इंडियाने २८ पदांसाठी भरती सुरु केली आहे. यापैकी ११ पदे ऑफिसर पदासाठी तर क्लर्क पदासाठी १४ पदे रिक्त आहेत. १ ऑगस्टपासून ही भरती सुरु झाली असून १६ ऑगस्टपर्यंत उमेदवार आपले अर्ज भरू शकतात. या सर्व जागा स्पोर्ट्स कोटाअंतर्गत भरल्या जाणार आहेत. Bank of India Recruitment 2020 जाहीरातीनुसार ऑफिसर पदासाठी महिन्याला २३,७०० ते ४२,०२० इतके वेतन असू शकते. तर क्लर्क पदासाठी महिन्याला ११,७६५ ते ३१,५४० इतके वेतन असू शकते.

उमेदवाराची पात्रता

ऑफिसर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतला पदवीधर असावा. त्याशिवाय अ, ब, क अशा स्पोर्ट्स कॅटेगरीमधील इव्हेंट किंवा चॅम्पियनशिप मिळवलेला असावा. क्लर्क पदासाठी उमेदवार १० पास तसेच ड कॅटेगरीतील स्पोर्ट्स इव्हेंट किंवा चॅम्पियनशिप मिळवलेला असावा.

- Advertisement -

उमेदवाराची वयोमर्यादा

१८ ते २५ वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. वयाची गणती १ जुलै २०२० च्या आधारे करण्यात येईल.

या रिक्त पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अंपग (PWD – Persons with Disabilities) प्रवर्गातील उमेदवारांना ५० रुपये शुल्क भरून अर्ज करता येईल. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी २०० रुपये शुल्क भरावे लागेल. शुल्क ऑनलाईन पद्धतीने देखील भरता येऊ शकते. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या https://bankofindia.co.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा. अर्ज भरण्याची शेवटची मुदत १६ ऑगस्ट २०२० आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -