Homeक्राइमBank Robber firing : चकमकी दरम्यान बँक दरोड्यातील एकाला अटक, अन्य दोघांनाही...

Bank Robber firing : चकमकी दरम्यान बँक दरोड्यातील एकाला अटक, अन्य दोघांनाही ठोकल्या बेड्या

Subscribe

चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन बँकेपासून 200 मीटर अंतरावर दुचाकी उभी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. यानंतर ते पायीच बँकेत पोहोचले. चोरट्यांना बँकेचा रस्ता माहीत होता. म्हणजेच, त्यांनी यापूर्वीच रेकी केल्याचे स्पष्ट झाले.

(Bank Robber firing) लखनऊ : इंडियन ओव्हरसीज बँकेतील लॉकरमधील कोट्यवधी रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीतील एका गुन्हेगाराला सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीदरम्यान अटक करण्यात आली. तथापि, त्याचे तीन साथीदार तेथून पळून गेले. मात्र, पोलिसांनी नाकाबंदी करून दोघांना अटक केली. (Police arrested three people in the bank robbery)

लौलाई गावाजवळील जलसेतू परिसरातून दोन संशयास्पद वाहने जात असल्याची माहिती सोमवारी सकाळी मिळाली. तपासणीसाठी पोलिसांची तीन पथके त्या वाहनांची वाट पाहात होती. ती वाहने आल्यावर त्यांना थांबवून चौकशी करत असतानाच एकाने पोलिसांवर गोळीबार केला. हे पाहताच प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक आरोपीच्या पायाला गोळी लागली. त्याला अटक करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अरविंद कुमार असे त्याचे नाव आहे. मात्र, या चकमकीचा फायदा घेऊन दुसऱ्या वाहनातून प्रवास करणारे तीन साथीदार फरार झाले. मात्र, पोलिसांनी पुढे नाकाबंदी करून दोन आरोपींना अटक केली.

- Advertisement -

हेही वाचा – SS UBT Vs EC : ‘17 A’ची मागणी करणे गैर काय? ठाकरे गटाचा निशाणा निवडणूक आयोगावर

नेमकी घटना काय?

मटियारा चौक पोलीस चौकीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर अयोध्या महामार्गानजीक असलेल्या इंडियन ओव्हरसीज् बँकेच्या चिन्हाट शाखेत चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत 42 लॉकर कापून कोट्यवधी रुपयांचे दागदागिने आणि किमती ऐवज घेऊन पोबारा केला. जवळपास तीन तास चोरट्यांकडून ही लूटमार सुरू होती, पण नादुरुस्त सायरन आणि सुरक्षारक्षकच तैनात नसल्याने याची खबर कोणालाच लागली नाही. सकाळी याची माहिती मिळताच खळबळ उडाली आणि पोलिसांनी लागलीच शोधमोहीम हाती घेतली.

- Advertisement -

चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन बँकेपासून 200 मीटर अंतरावर दुचाकी उभी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. यानंतर ते पायीच बँकेत पोहोचले. चोरट्यांना बँकेचा रस्ता माहीत होता. म्हणजेच, त्यांनी यापूर्वीच रेकी केल्याचे स्पष्ट झाले. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शनिवारी रात्री 12.35 वाजता बुरखा घातलेल्या चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला आणि रविवारी पहाटे 4.35 वाजता ते बाहेर पडले.

हेही वाचा – Sarsanghchalak Vs Hindu Priest : मतांची गरज होती तेव्हा…, अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचा भागवतांना टोला

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला असता, त्यांना बँकेच्या आवाराबाहेर एकच कॅमेरा लावलेला आढळला. बँकेच्या पाठीमागील रिकाम्या प्लॉटमधून चोरट्यांनी बँक आवारात प्रवेश केला होता, तेथील भिंत फुटली होती. मग, त्यांनी मागील भिंतीवरून उड्या मारून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी लॉकर रूमची भिंत सुमारे दोन फूट वर्तुळात कापली. चार चोरटे बँकेच्या आत गेले तर अन्य चारजण बाहेर पहारा देत होते.

बँकेची बेपर्वाई आधीपासूनच

एवढी मोठी बँक असूनही व्यवस्थापनाने ग्राहकांच्या पैशांबाबत आधीपासूनच उदासीनता दाखवली आहे. बँकेतील सायरन नादुरुस्त तर होताच, पण सुरक्षारक्षकही नव्हता. केवळ रात्रीच नव्हे तर, दिवसाही सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेला नाही, असे सांगितले जाते. बँकेत बसवण्यात आलेले एसीचे आऊटडोअर युनिटची दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. याआधीही एटीएममध्ये छेडछाड करण्यात आली होती. (Bank Robber firing: Police arrested three people in the bank robbery)

हेही वाचा – SS UBT Vs BJP : मोदी-शहा-फडणवीसांनी न्याय अधिकारांची नाकाबंदी केली, ठाकरे गटाचा घणाघात


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -