Homeक्राइमBank Robbery : सायरन नादुरुस्त... सुरक्षारक्षक नाही... चोरट्यांची चांदी, 42 लॉकर कापून...

Bank Robbery : सायरन नादुरुस्त… सुरक्षारक्षक नाही… चोरट्यांची चांदी, 42 लॉकर कापून कोट्यवधी लुटले

Subscribe

लॉकर कापले असल्याने नक्की किती रक्कम चोरीला गेली, हे सांगता येणार नाही. कारण लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आणि रकमेची नोंद बँकेकडे नसते.

(Bank Robbery) लखनऊ : लखनऊमधील अयोध्या महामार्गानजीक असलेल्या इंडियन ओव्हरसीज् बँकेत चोरट्यांनी शनिवारी पहाटेपर्यंत 42 लॉकर कापून कोट्यवधी रुपयांचे दागदागिने आणि किमती ऐवज घेऊन पोबारा केला. जवळपास तीन तास चोरट्यांकडून ही लूटमार सुरू होती, पण नादुरुस्त सायरन आणि सुरक्षारक्षकच तैनात नसल्याने याची खबर कोणालाच लागली नाही. विशेष म्हणजे, सुमारे महिन्याभरापूर्वी पोलीस आयुक्तांनी रात्रीच्या गस्तीची विशेष व्यवस्था केली होती, तिचा फोलपणाही या निमित्ताने उघडकीस आला आहे. (In Uttar Pradesh, 30 bank lockers were cut and looted worth crores)

कोट्यवधी रुपयांच्या या दरोड्यामुळे ओव्हरसीज् बँक अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाही स्पष्ट झाला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने बँकेत बसविण्यात आलेला सायरन सुस्थितीत नव्हता. वस्तुत:, तो वाजला असता तर पोलीस ठाण्याला वेळीच माहिती मिळाली असती आणि पोलिसांना चोरट्यांचा डाव उधळता आला असता. या संदर्भात अतिरिक्त पोलीस उपायुक्त (ADCP) पंकज सिंग यांनी बँकेच्या व्यवस्थापकाकडे सायरनबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. चोरट्यांनी सायरन उचकटून काढल्याचे बँक मॅनेजरने सांगितले. पण चोरट्यांनी तसे केले असते तर, त्याचा मेसेज आला असता, असा दावा एडीसीपीने सांगितल्यावर, तसा मेसेज आला नसल्याचे उत्तर बँक मॅनेजरने दिल. याबाबत बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून कारवाई करण्यात येईल, असे एडीसीपीने सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – SS UBT Vs EC : ‘17 A’ची मागणी करणे गैर काय? ठाकरे गटाचा निशाणा निवडणूक आयोगावर

महत्त्वाचे म्हणजे, लॉकर कापले असल्याने नक्की किती रक्कम चोरीला गेली, हे सांगता येणार नाही. कारण लॉकरमध्ये कितीही दागिने वा रक्कम ठेवता येते आणि त्याची नोंद बँकेकडे नसते. त्यामुळे चोरट्यांना जेरबंद करण्याबरोबरच लुटीच्या रकमेचा ताळमेळ ठेवणे, हे पोलीस आणि बँक व्यवस्थापनासमोर एक आव्हानच आहे.

- Advertisement -

बँकेची बेपर्वाई आधीपासूनच

एवढी मोठी बँक असूनही व्यवस्थापनाने ग्राहकांच्या पैशांबाबत आधीपासूनच उदासीनता दाखवली आहे. बँकेतील सायरन नादुरुस्त तर होताच, पण सुरक्षारक्षकही नव्हता. केवळ रात्रीच नव्हे तर, दिवसाही सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेला नाही, असे सांगितले जाते. बँकेत बसवण्यात आलेले एसीचे आऊटडोअर युनिटची दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. याआधीही एटीएममध्ये छेडछाड करण्यात आली होती.

पोलीस आयुक्तांच्या उपाययोजना फोल

रात्रीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी 11 नोव्हेंबर रोजी एक अतिरिक्त पोलीस उपायुक्त (ऑपरेशनल कमांडर) आणि दोन सहायक पोलीस आयुक्त (असिस्टंट ऑपरेशनल कमांडर) यांची ‘नाइट झोनल पोलिसिंग’ टीम तयार केली होती. हे अधिकारी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कार्यरत राहण्याबरोबरच त्यांच्यामाध्यमातून पीआरव्ही पेट्रोलिंगही करण्यात येणार आहे. पण बँक लुटणाऱ्या चोरट्यांनी ही टीम कुचकामी ठरवली आहे. कारण ही टीम सक्रिय असती तर एवढी मोठी लूट झाली नसती, असे सर्वसामन्यांचे म्हणणे आहे. (Bank Robbery: In Uttar Pradesh, 30 bank lockers were cut and looted worth crores)

हेही वाचा – Divorce case : मुलीकडच्या मंडळींनी सासरी तळ ठोकून बसणे क्रूरताच, कलकत्ता हायकोर्टचे निरीक्षण


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -