घरताज्या घडामोडीBank Strike: बँक कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक, बँकिंग सेवा होणार विस्कळीत

Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक, बँकिंग सेवा होणार विस्कळीत

Subscribe

राष्ट्रीयकृत बँकाच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सकडून १६ आणि १७ डिसेंबर रोजी बँकेकडून संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा यांसारख्या बड्या सरकारी बँकेची कामं विस्कळीत होऊ शकतात.

मंबईतील आझाद मैदानात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या महाराष्ट्र शाखेकडून सरकार विरोधात धरणे आंदोलन केले जाणार आहे. सार्वजनिक बँकांतील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सरकार बड्या उद्योजकांची कर्जे माफ करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सार्वजनिक बँकांचं खाजगीकरण देखील होत आहे. सरकारी बँकांमध्ये लाखोंच्या ठेवी या सामान्य ग्राहकांसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सलग दोन दिवस संप सुरू असणार आहे. त्यामुळे सरकारी बँकांची क्लिअरिंग कोलमडण्याची शक्यता आहे. या संपामुळे एसबीआय सारख्या मोठ्या बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपामुळे गैरसोय होऊ नये त्यामुळे ग्राहकांसाठी बँकेकडून सूचना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : Bullock Cart Race: अर्धी लढाई जिंकलो, उर्वरीत लढाई महाविकास आघाडीची जबाबदारी – खासदार अमोल

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -