घरताज्या घडामोडीसरकारी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक, ३ दिवस बँका बंद राहण्याची शक्यता; जाणून...

सरकारी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक, ३ दिवस बँका बंद राहण्याची शक्यता; जाणून घ्या

Subscribe

सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी (Bank Strike) २७ जून रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. बँकेचे कर्मचारी पेन्शनसंबंधातील (Pension) मुद्दे आणि आठवड्यातून पाच दिवस काम करण्याची मागणी करणार आहेत. पेन्शन धारकांसाठी पेन्शन अपडेट करणे, त्यात सुधारणा करणे, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करणे आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी (Bank Employees) जुनी पेन्शन योजना नव्याने सुरू करणे, यांसारख्या समस्यांसाठी बँक संघटनांनी  देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे.

कोणत्या संघटनांनी दिला पाठिंबा?

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्ससह एकूण नऊ बँकांनी संपाची हाक दिली आहे. २७ जून रोजी देशभरातील बँकांचे कामकाज बंद राहणार आहेत. तसेच तीन दिवस बँका बंद राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

…तर बँका सलग तीन दिवस राहणार बंद

२५ जून आणि २६ जून रोजी देशभरातील बँकेचे कामकाज ठप्प राहणार आहेत, कारण २५ जूनला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. तसेच २६ जूनला रविवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे २७ जून रोजी संपामुळे बँकांचे कामकाज होणार नसले तरी, सलग ३ दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारी क्षेत्रातून बँकांना इशारा

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी या संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे बँकेचे कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते २५ जूनपूर्वी पूर्ण करून घ्या. कारण संपाच्या दरम्यान तीन दिवस काम रखडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Bank Strike: बँक कर्मचारी संपामुळे देशभरात १६५०० कोटींचे चेक व्यवहार ठप्प


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -