Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तीन दिवस बँक राहणार बंद; जरूरी काम करुन घ्या

तीन दिवस बँक राहणार बंद; जरूरी काम करुन घ्या

Subscribe

तुमची बँकेची काही कामे असतील तर ती येत्या तीन दिवसात उरका कारण तीन दिवस बँक बंद राहणार आहे.

बँक ग्राहकांकरता एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमची बँकेची काही कामे असतील तर ती येत्या तीन दिवसात उरका कारण तीन दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे तुमचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकेंडपर्यंत थांबू नका, गुरुवारपर्यंत बँकिंगची कामे करा. या आठवड्यात बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहे.

येत्या २५ डिसेंबर, शुक्रवारी नाताळ निमित्ताने बँका बंद राहणार आहेत. तसेच प्रत्येक महिन्यात बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतात. त्यामुळे नाताळच्या दुसऱ्यादिवशी २६ डिसेंबरला चौथा शनिवार आला असून त्यानंतर रविवारी अर्थात आठवड्याची सुट्टी असणार आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत..

नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता

- Advertisement -

दरम्यान, पुढील आठवड्यात वर्षातील अखेरचा दिवस येणार आहे. त्यानंतर १ जानेवारीपासून बँकांच्या अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे बँकांची कामे वेळेत पूर्ण करुन फार गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या खिशाला कात्री बसू शकते.

आयकर भरण्याची ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

आयकर भरण्यासाठी सरकारने येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मदत दिली आहे. आयकर भरण्यासाठी तुम्हाला बँकेच्या कागदपत्रांची आवश्यकता भासल्यास सुट्ट्यांमुळे ते शक्य होणार नाही. त्यामुळे येत्या २४ डिसेंबरपर्यंत बँक संबंधी सर्व कामे करुन घेणे गरजेचे आहे.


- Advertisement -

हेही वाचा – थंडीचा कडाका, नाशिक ९ अंशांवर


 

- Advertisment -