Bank Strike : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! डिसेंबर महिन्यातील २ दिवसांसाठी बँकेकडून संपाची हाक

बँकेत खातं असणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण जर डिसेंबर महिन्यांत तुमचे काही महत्त्वाची कामं असतील तर लवकर करून घ्या. देशातील सरकारी बँक कर्मचारी १६ आणि १७ डिसेंबर रोजी संपावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन दिवसांमध्ये बँकेतील सर्व प्रकारची काम दोन दिवसांसाठी ठप्प राहणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक यूनिअन (UFBU-United Forum of Bank Unions) ने यांसदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे.

बजेटमधून झाली होती घोषणा

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फ्रेब्रुवारी २०२१ ला बजेटचं सादरीकरण केलं होतं. या बजेटमध्ये खाजगीकरणासंदर्भातील मोठा निर्णय घेण्यात आला होता. सरकार या हिवाळी अधिवेशनात बँकेविषयी संशोधन कायदे व विधेयक आणण्यासाठी तयारी केली जाणार आहे. सरकार खाजगीकरण करण्याच्या मार्गावर असल्यामुळे विरोध करण्यासाठी यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने संपाची हाक दिली आहे. UFBU सह बँकेत एकूण नऊ यूनिअन येतात.

सरकार बँकिंग अधिनियम विधेयक, २०२१च्या हिवाळी अधिवेशनात सादरीकरण केलं जाणार आहे. त्यासाठी ते सुचीबद्ध आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाचे महासचिव सी एच वेंकटचलमने केलेल्या विधानानुसार, यूएफबीयूने निजीकरणासाठी एक पाऊल उचललं असल्यामुळे त्याचा विरोध करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. संपाशिवाय डिसेंबर महिन्यातील काही दिवसांमध्ये काम केलं जाणार नाहीये.

डिसेंबर महिन्यात बँकेला सुट्टी कधी?

३ डिसेंबर – फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस जेविअर
५ डिसेंबर – रविवार
११ डिसेंबर – शनिवार (महिन्यातील दुसरा शनिवार)
१२ डिसेंबर – रविवार
१९ डिसेंबर – रविवार
२४ डिसेंबर – ख्रिसमस फेस्टिवल
२५ डिसेंबर – ख्रिसमस (महिन्यातील चौथा शनिवार)
२६ डिसेंबर – रविवार
२७ डिसेंबर – ख्रिसमस फेस्टिवल
३१ डिसेंबर – नवीन वर्षाची सुरूवात

बँकेच्या ऑफिशिअल लिंकला भेट द्या…

रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या गाईडलाईन्स नुसार, रविवारी बँक बंद असतात. त्यानंतर दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातील शनिवारी बँकेचे कोणतेही कामकाज केले जात नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक ऑफिशिअल लिंक https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx वर भेट देण्यास सांगितली आहे. यामध्ये तुम्हाला महिन्याभरातील बँकेला किती सुट्टी आहेत. या संदर्भातील माहिती मिळेल.