घरताज्या घडामोडीBanks Closed: देशात 'या' शहरात आजपासून दोन दिवस सर्व बँका बंद

Banks Closed: देशात ‘या’ शहरात आजपासून दोन दिवस सर्व बँका बंद

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यादरम्यान रमजान ईद सण आला आहे. त्यामुळे पुढील येणारे सण लक्षात घेता बँकेच्या सुट्ट्या घोषित केल्या आहेत. ईदच्या दिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी सुट्टी घोषित केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकच्या माहितीनुसार, ईदची सुट्टी १३ मे म्हणजे आज घोषित केली आहे. पण काही ठिकाणी ही सुट्टी १४ मे रोजी असणार आहे. या सुट्ट्या रिझर्व्ह बँकेने निगोशिएबल कलमांतर्गत घोषित केल्या आहेत.

१३ मे म्हणजे आज जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर, बेलापूर आणि तिरुवनंतपुरम येथे ईदमुळे बँक बंद आहेत. तर १४ मेला अगरतला, अहमदाबाद, ऐझाव्ल, बेंगळूरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, चेन्नई, देहरादून, गंगतोक, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाल, जयपूर, कानपूर, कोलकात, लखनऊ, नवी दिल्ली, पणजी, पटना, रायपूर, रांची शिलॉंग आणि शिमलामध्ये बँक बंद असणार आहेत. या दिवसात ईदसोबत परशुराम जयंती, अक्षय्यतृतीया सण साजरे केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत देशात अनेक राज्यांमध्ये या दिवशी बँकांमध्ये सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

- Advertisement -

यावर्षी २६ मेला बुद्ध पोर्णिमा असून त्यामुळे अनेक बँकामध्ये कामकाज स्थगित असणार आहे. १६ मे आणि २३ मेला रविवार आणि २२ मे चौथा शनिवार असणार आहे, यामुळे अनेक ठिकाणी या दिवशी बँका बंद असणार आहे. शिवाय ३० मेला रविवार असल्यामुळे यादिवशी बँक बंद असेल. दरम्यान बँकेच्या सुट्ट्या अगोदरच ठरलेल्या असतात.


हेही वाचा – कोरोना झाल्यानंतर शरीरात किती दिवस अँटीबॉडीज राहतात?; वैज्ञानिकांनी केला खुलासा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -