घरताज्या घडामोडीBank Holidays: १४ ते १७ एप्रिलपर्यंत या शहरांमध्ये बंद राहणार बँका, कधी...

Bank Holidays: १४ ते १७ एप्रिलपर्यंत या शहरांमध्ये बंद राहणार बँका, कधी ते जाणून घ्या?

Subscribe

या आठवड्यात तुमचा बँकेत जाण्याचा प्लॅन असेल किंवा बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर लवकर करून घ्या. कारण या आठवड्याच्या दोन दिवसां अगोदर बँकेला सुट्टी मिळणार आहे. म्हणजेच सलग पुढील ४ दिवस कोणतेही काम तुम्हाला करता येणार नाहीये. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे काम असल्यास बँका कधी बंद राहणार आहेत ते तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही.

जाणून घ्या कोणत्या दिवशी बंद राहतील बँका

या आठवड्यातील १४, १५, १६ आणि १७ एप्रिल रोजी बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. रविवारच्या सुट्टीचाही या सुट्ट्यांच्या यादीत समावेश आहे. १४, १५, १६ एप्रिल रोजी मोजक्याच शहरांतील बँकांना सुट्टी असणार आहे.

- Advertisement -

आरबीआयकडून लीस्ट जारी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकेतील सुट्ट्यांची यादी जारी करण्यात आली आहे. कर्मचारी आणि ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून आरबीआय वर्षाच्या सुरुवातीला बँकेतील सुट्ट्यांची यादी जारी करते.

कधी आणि कुठे राहणार बँका बंद?

१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/ महावीर जयंती/ तामिळ नववर्ष/ बिजू उत्सव/ बोहाग बिहू सणानिमित्त शिलाँग आणि शिमला वगळता बँका बंद राहतील.

- Advertisement -

१५ एप्रिल – जयपूर, जम्मू आणि श्रीनगरमध्ये गुड फ्रायडे/बंगाली नववर्ष/हिमाचल दिवस/विशू/बोहाग बिहूच्या कारणास्तव जयपूर, जम्मू आणि श्रीनगर व्यतिरिक्त इतर ठिकाणी बँका बंद राहणार आहेत.

१६ एप्रिल – गुवाहाटीमध्ये बोहाग बिहूच्या कारणास्तव बँका बंद राहतील

१७ एप्रिल – रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद राहणार आहेत.

एप्रिल महिन्यात एकूण १५ दिवस बँका बंद

प्रत्येक राज्यातील सुट्ट्यांची यादी त्या-त्या राज्यातील सणांनुसार ठरवली जाते. त्यापैकी काही बँकांना सुट्ट्या मिळाल्या आहेत. तर काही सुट्ट्या बँकांना येत्या आठवड्यात मिळणार आहेत.


हेही वाचा : पवारसाहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळच असतं – यशोमती ठाकुर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -