Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशBank Holiday In March : मार्च महिन्यात तब्बल 14 दिवस बँक बंद, जाणून घ्या कामकाजाचे दिवस

Bank Holiday In March : मार्च महिन्यात तब्बल 14 दिवस बँक बंद, जाणून घ्या कामकाजाचे दिवस

Subscribe

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. आरबीआयच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार मार्च महिन्यात बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. आरबीआयच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार मार्च महिन्यात बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये सार्वजनिक सुट्ट्या, प्रादेशिक सुट्ट्या आणि नियमित सुट्ट्या (दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह सर्व रविवार) यांचा समावेश आहे. राज्य-विशिष्ट सणांच्या काळात बँका फक्त संबंधित राज्यांमध्ये बंद राहतील, तर होळी आणि रमजानसारख्या प्रमुख सणांच्या दिवशी बहुतेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. (Banks will remain closed for a total of 14 days in March)

मार्च महिन्यातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्यांची यादी

2 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
7 मार्च (शुक्रवार) – चापचर कुट महोत्सव (मिझोरममध्ये बँका बंद)
8 मार्च (दुसरा शनिवार) – साप्ताहिक सुट्टी
9 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
13 मार्च (गुरुवार) – होलिका दहन आणि अट्टुकल पोंगल (उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि केरळमध्ये बँका बंद)
14 मार्च (शुक्रवार) – होळी (धुळेटी/धुळंदी/डोल जत्रा) (त्रिपुरा, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, मणिपूर, केरळ आणि नागालँड वगळता बहुतेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी)
15 मार्च (शनिवार) – निवडक राज्यांमध्ये होळीची सुट्टी (अगरतळा, भुवनेश्वर, इंफाळ आणि पटना येथे बँका बंद)
16 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
22 मार्च (4था शनिवार) – साप्ताहिक सुट्टी आणि बिहार दिन
23 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
27 मार्च (गुरुवार) – शब-ए-कद्र (जम्मूमध्ये बँका बंद)
28 मार्च (शुक्रवार) – जुमातुल विदा (जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद)
30 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
31 मार्च (सोमवार) – रमजान-ईद (ईद-उल-फित्र) (मिझोरम आणि हिमाचल प्रदेश वगळता बहुतेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी)

हेही वाचा – Delhi stampede : 200 मृत्यूचा पुरावा काय? न्यायालयाने चेंगराचेंगशी संबंधित याचिका फेटाळली

सुट्टीच्या दिवशी नेट बँकिंग आणि यूपीआयचा करा वापर

मार्च महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र या काळात नेट बँकिंग आणि यूपीआयसारख्या सुविधा सुरळीतपणे सुरू राहतील. तसेच या काळात जर तुम्हाला रोख रकमेची गरज असेल तर तुम्ही एटीएमचा वापर करू शकता. मात्र तुम्हाला चेक जमा करायचा असेल किंवा रोख व्यवहार करायचा असेल तर या बँकांच्या सुट्ट्या लक्षात घेऊन तुमचे काम आधीच पूर्ण करावे लागेल.

बँकेच्या सुट्ट्या कशा ठरतात?

दररोज कामावर जाणाऱ्या नागरिकांना बँकेची काम करायची असतील तर त्यांना आठवड्यात शनिवार हा एकच दिवस मिळतो. त्यामुळे त्यांनी जर मधल्या एखाद्या दिवशी सुट्टी घेऊन बँकेचे काम करायचे ठरवले तर अशावेळी अनेकदा एखाद्या सणामुळे बँका बंद असतात. त्यामुळे सुट्टी घेतलेल्या नागरिकांची निराशा होते. यानंतर प्रश्न पडतो तो, बँकेच्या सुट्ट्या कोण ठरवतो आणि सुट्या कशा ठरतात? तर याचे उत्तर आहे की, आरबीआय सर्व राज्यांसाठी बँकेच्या सुट्ट्यांची यादी तयार करतो. ही यादी त्या-त्या राज्यातील सण, राष्ट्रीय सुट्ट्या इत्यादी लक्षात घेऊन तयार केली आहे. जर बँक सुट्टीच्या यादीव्यतिरिक्त इतर कोणत्याही दिवशी बंद ठेवण्यात येणार असेल तर आरबीआय त्यासाठी स्वतंत्र परिपत्रक किंवा अधिसूचना जारी करते.

हेही वाचा – Avalanche Badrinath Dham : ग्लेशियर तुटल्याने अपघात; 57 कामगार दबले तर 16 जणांना वाचविण्यात यश