घरदेश-विदेशचिनी App वर भारतात बंदी; तरी या 'अवतारात' नव्याने एन्ट्री

चिनी App वर भारतात बंदी; तरी या ‘अवतारात’ नव्याने एन्ट्री

Subscribe

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता हे अ‍ॅप्स नव्या रुपात पुन्हा भारतीय युजर्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अ‍ॅप स्टोअरवर चिनी अ‍ॅप्सची संख्याही वाढताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यात चिनी अ‍ॅप्सचे रिब्रँडेड व्हर्जनही आहेत.

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सुरूवातीला केंद्र सरकारने टिकटॉकसहित ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलै महिन्यात ४७ आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ११८ अ‍ॅप्स बॅन करण्यात आली होती. परंतू आता समोर आलेल्या रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबाबत माहिती अशी की, स्नॅक व्हिडिओ हे अ‍ॅप टेन्सेंटच्या kuaishou या चिनी कंपनीने तयार केले आहे. विशेष बाब ही की अ‍ॅप एकमद Kwai या अ‍ॅपप्रणाणे दिसते. हे अ‍ॅप सरकारने बॅन केले होते. स्नॅक व्हिडीओला गुगल प्ले स्टोअरवर १० कोटींपेक्षा अधिक डाउनलोड्स मिळाले आहे. इतकेच नव्हे तर या अ‍ॅपमध्ये टिकटॉकसारखेही फिचर्स देण्यात आले आहेत.

- Advertisement -

नव्या रूपात आलेल्या चिनी अ‍ॅप्सबद्दल प्रश्न विचारल्यानंतर यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना दिली. त्यांनी म्हटले की, जर असं काही होत असेल तर त्यावर आम्ही नक्कीच कठोर पावलं उचलू. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणतंही बॅन करण्यात आलेलं चिनी अ‍ॅप नव्या रूपात उपलब्ध होऊ दिलं जाणार नाही.

हेही वाचा –

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक : शासनाच्या घोषणा पत्रकांची होळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -