घरताज्या घडामोडीपत्नीचे सहा तुकडे करुन मृतदेह लपवला; क्षुल्लक चुकीमुळे आरोपी पती पोलिसांच्या जाळ्यात...

पत्नीचे सहा तुकडे करुन मृतदेह लपवला; क्षुल्लक चुकीमुळे आरोपी पती पोलिसांच्या जाळ्यात फसला

Subscribe

उत्तर प्रदेशातील बाराबंकी गावात एका बॅगेत महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण पोलिसांनी छोटे छोटे पुरावे एकत्र करून आरोपी पतीला गाठलंच. आरोपी पती यावेळी नेपाळला जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांच्या सापळ्यात तो अलगद अडकला. काही दिवसांपूर्वी लखनऊ – अयोध्या हायवेवर कोतवाली क्षेत्रात एका बॅगेमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. अनेक पुराव्यानंतर या महिलेची ओळख पोलिसांना पटली. मुंबईतील आंबेडकरनगर येथील मालन सम्राट शेख उर्फ ​​आयशा यांचा हा मृतदेह होता. लखनौच्या इंदिरानगरमध्ये आयशाची तिच्या पतीने हत्या केली आणि मृतदेहाचे सहा तुकडे केले. पोलिसांनी आरोपीला पाळत ठेऊन अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पती-पत्नींमध्ये वाद झाला आणि वाद टोकाला गेल्यामुळे पतीने हे पाऊल उचलले. पती समीर खानने ५ जुलैला झालेल्या वादात पत्नी आयशाची हत्या लोखंडी रॉडने केली. समीर हा बलरामपूरच्या महाराजगंज पोलीस स्टेशन परिसरातील गुलहरीचा रहिवासी आहे. तो मुंबईच्या वांद्रे भागात कोंबडीच्या दुकानात काम करायचा. पण लॉकडाऊनअसल्यामुळे तो लखनौला परत आला.

- Advertisement -

आयशाच्या हत्येनंतर समीरने मार्केटमधून मृतदेह गुंडाळायला कापड आणले आणि त्याच रात्री त्याने आयेशाच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले. त्यानंतर तो कारमधून ब्रीफकेस आणि बॅग घेऊन हायेववर गेला आणि बॅग फेकून दिली.

असा लागला पोलिसांना सुगावा

ज्या ब्रीफकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडला त्यामध्ये पोलिसांना दोन महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडले. बॅगमध्ये आरोपीची जीन्स होती. ज्यात लखनौच्या उद्यानाची दोन तिकिटे होती. आणखी एक महत्त्वाचा सुगावा म्हणजे बॅगेत ठेवलेला वीज बिल होता. हे बिल इतके जुने होते की त्यामध्ये केवळ काही संख्या दिसत होती. त्यानंतर पोलिसांनी या दोन पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला.

- Advertisement -

विजेच्या बिलावर एका महिलेचे नावे होते. पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता तीने समीरला घर विकल्याचे सांगितले. इथूनच पोलिसांना समीरचा नंबर मिळाला. त्यानंतर पोलिसांनी समीरच्या मोबाइलचा तपशील शोधला. मात्र, आरोपींनी तो मोबाइल बंद केला होता. असे असूनही, पोलिसांना सायबर सेलच्या मदतीने आरोपींचा नवीन नंबर मिळाला आणि आरोपीला अटक केली. एसपीने सांगितले की आरोपी समीर खान नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -