घरताज्या घडामोडीब्रिटनच्या महाराणीची सत्ता हटवून ४०० वर्षानंतर बार्बाडोस बनलं नवं प्रजासत्ताक राष्ट्र

ब्रिटनच्या महाराणीची सत्ता हटवून ४०० वर्षानंतर बार्बाडोस बनलं नवं प्रजासत्ताक राष्ट्र

Subscribe

कॅरेबियन बेटांमधील बार्बाडोस देशाने जवळपास ४०० वर्षांनंतर ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीयला राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवून आणि ब्रिटिशांशी वसाहतवादी संबंध संपवले आहेत. आता बार्बाडोस देश जगातील नवं प्रजासत्ताक राष्ट्र बनलं आहे (Barbados become world’s newest republic). सांद्रा मसोन (Sandra Mason) या बार्बाडोसच्या पहिल्या राष्ट्रपती असणार आहेत. प्रजासत्ताक राष्ट्र बनल्यामुळे बार्बाडोसच्या नागरिकांनी रात्री उशिरा रस्त्यावर येऊन स्वतंत्र मिळाल्याचा जल्लोष केला.

प्रजासत्ताक राष्ट्र बनल्यानंतर राजधानीच्या हीरोज स्क्वायरवर देशाचे राष्ट्रगीत वाजवले आणि २१ तोफ्याची सलामी दिली. यानिमित्ताने ब्रिटन प्रिन्स चार्ल्स उपस्थितीत होते. त्यांच्यासमोर महाराणी एलिझाबेथचा ध्वज उतरवला गेला. ते म्हणाले की, यानिमित्ताने त्यांच्या आईने शुभेच्छा दिल्या आहेत. ही नवी सुरुवात असल्याचे त्या म्हणाल्या. गुलामगिरीच्या वेदनादायक यातनांमधून बाहेर पडून देशातील नागरिकांनी आपल्या ताकदीने मार्ग काढला आहे. त्यांच्या घोषणेनंतर देशातील नागरिकांनी पारंपारिक नृत्यू केले आणि संगीत वाजवले.

- Advertisement -

यादरम्यान देशाच्या नव्या आणि पहिल्या राष्ट्रपती झालेल्या सांद्रा मसोन म्हणाल्या की, वसाहतवादी भूतकाळ मागे सोडण्याची वेळ आली आहे. नागरिकांना असं वाटतेय की, आपल्या देशाचा माणूस देशाचा प्रमुख व्हावा.

ब्रिटनची महामारी एलिझाबेथ द्वितीय अजूनही १५ देशांच्या राष्ट्राध्यक्ष आहेत. यामध्ये युनायटेड किंग्डम व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, कॅनाडा आणि जमैकाचा समावेश आहे. बार्बाडोसने महाराणीला राष्ट्राध्यक्षच्या पदावरून हटवून नवीन सुरुवात केली आहे. त्यांच्या जागी आता सांद्रा मसोन देशाच्या राष्ट्रपती पदी दिसतील.

- Advertisement -

हेही वाचा – US School Shooting: १५ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेत केला गोळीबार; ३ जणांचा मृत्यू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -