घरदेश-विदेशसन्मानासाठी शबनमची झाली शिवानी; मुस्लीम मुलीच्या हिंदू विवाहास कोर्टाची मान्यता

सन्मानासाठी शबनमची झाली शिवानी; मुस्लीम मुलीच्या हिंदू विवाहास कोर्टाची मान्यता

Subscribe

भारतात आजही आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना म्हणावा तसा पाठींबा दिला जात नाही. मात्र उत्तरप्रदेशातील बरेलीमध्ये एका मुस्लीम मुलीच्या हिंदू विवाहास थेट कोर्टानेच मान्यता दिली आहे. त्यामुळे शबमन नावाच्या एक महिलेस शिवानी म्हणून तिचे नवे आयुष्य सुरु करण्यास संधी मिळाली आहे. शबनमने पतीच्या जाचाला कंटाळून एका हिंदू मुलाशी विवाह केला. मात्र हा विवाह अवैध असल्याचे म्हणत तिच्या आधीच्या पतीने थेट कोर्टाचे दार ठोठावले. मात्र कोर्टाने तिच्या बाजूने निकाल दिला आहे.

पोलिसांनी शबनमला पोलिसांनी कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर केले असता तिने कोर्टासमोरही आपली बाजू अगदी स्पष्टपणे मांडली. शबनम म्हणाली की, सन्मानासाठी तिने इस्लाम धर्म सोडला आणि ती शबनमची शिवानी बनली. या निर्णयावर ती म्हणते की, मी प्रौढ आहे आणि मी स्वतःचे निर्णय स्वत: घेऊ शकते.

- Advertisement -

दरम्यान हिंदू मुलासोबत केलेल्या विवाहावर बोलताना शबनम म्हणाली की, मी आकाशसोबत आयुष्यभर आनंदी राहीन. हिंदू महिलांचा आदर केला जातो, म्हणून मीही इस्लाम सोडून हिंदू झाले आहे. माझे नाव आता शबनम नाही तर शिवानी आहे. तिची बाजून ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानेही तिला आकाशसोबत आयुष्य घालवण्यास परवानगी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

या घटनेवरून तुमच्याही मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, ही शबनम नेमकी कोण आहे? आणि तिच्या विवाहाची एवढी चर्चा का होतेय. वास्तविक शबनम बरेली मंडलाच्या शाहजहांपूरमधील एका गावात राहणारी महिला आहे. तिचा विव फरीदपूरमध्ये राहणाऱ्या एका मुस्लिम तरुणासोबत झाला होता. मात्र तिने आता एका हिंदू पुरुषासोबत दुसरं लग्न केलं आहे.

- Advertisement -

संबंधित हिंदू पुरुषाच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला असून त्याला या लग्नापासून तीन मुलं आहेत. दरम्यान शबनम तिच्या पहिल्या लग्नापासून खूश नव्हती. लग्न करून जेव्हा शबनम सासरी गेली तेव्हा स्वत:च्या हक्कांपासूनही दूर ठेवले गेले. तिला अनेक गोष्टींसाठी रोखले जात होते. छोट्या- छोट्या गोष्टींवरून सासरी खूप छळ व्हायचा. नवरा रोज मारहाण करायचा, अपमान करायचा. मात्र स्वत:च्या इच्छा, आकांक्षा मारत हे सर्व ती सहन करत राहिली. ज्यामुळे तिची मनातल्या मनात खूप घुसमट होत होती.

या दरम्यान तिची सोशल मीडियावर शाहजहांपूरच्या आकाश नामक एका हिंदू पुरुषाशी ओळख झाली, ज्याला ती तिच्या सर्व दु:ख सांगत होती. शबनमच्या म्हणण्यानुसार,पहिला पती तिचा रोज छळ करायचा. दोघांमधील घरगुती वाद मिटवण्याऐवजी तो इतरांसमोर तिला अपमानीत करायला. या अशापरिस्थीत तिला पहिल्या पतीपासून सुटका हवी होती.

अशा परिस्थितीत आकाश तिचे दु:ख समजून घेत होता. तिच्यासोबत तो रोज फोनवर बातचीत करू लागला. शबनमच्या प्रत्येक अडचणीत तो तिला मदत करत सांभाळून घेत होता. आकाशचा हाच स्वभाव तिला आवडला, याच वाढत्या संवादातून पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर सुमारे 10 दिवसांपूर्वी तिने आकाशला फरीदपूरला बोलावत त्याच्यासोबत पळून गेली.

यानंतर शबनमच्या पतीने तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आकाश आणि शबनमचा शोध घेतला. यावेळी शबनमने पोलिसांना ती प्रौढ असल्याचे म्हणत तिला तिचा अधिकार घेण्याचे स्वतंत्र असल्याचे सांगितले आहे. तसेच तिने स्वत:च्या इच्छेने तरुणाशी लग्न केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान शबनमच्या पहिल्या पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले. यावेळी कोर्टात शबनमने आपली बाजू मांडताना सांगितले की, हिंदू महिलांना सन्मान मिळतो. मलाही तोच समान हक्क आणि सन्मान हवा आहे, म्हणून मी माझ्या प्रियकराशी हिंदू धर्म स्वीकारत लग्न केले आहे. आता मी शबनम नाही तर शिवानी आहे. सध्या शबनम आकाशसोबत हिंदू महिला म्हणून संसार करत आहे.


शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याची किंमत गुजरातने वेदांता- फॉक्सकॉनच्या रूपाने केली वसूल; राष्ट्रवादीचा घणाघात


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -