घरदेश-विदेश'बाटा' कंपनीला ३ रुपयासाठी मोजावे लागले ८ हजार

‘बाटा’ कंपनीला ३ रुपयासाठी मोजावे लागले ८ हजार

Subscribe

बाटा कंपनीला जाहिरात करणे चांगलेच महागात पडले असून तीन रुपयांसाठी ९ हजार रुपयाचा फटका पडल्याचे समोर आले आहे.

राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. शिवाय प्लास्टिक बंदीनंतर दंडात्मक कारवाई करण्यासाठी देखील खास पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात कागदी पिशव्यांचा वापर केला जातो. मात्र या कागदी पिशव्यांसाठी ग्राहकांकडूनच पैसे आकारले जात असल्याचे समोर आले आहे. ग्राहकाकडून कागदी पिशवीकरता पैसे आकारणे बाटा कंपनीला चांगलेच महागात पडल्याचे समोर आले आहे. ३ रुपयाच्या कागदी पिशवीकरता त्यांना नऊ हजाराचा दंड आकारण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

चंदिगडमध्ये राहणारे रहिवासी दिनेश हे बाटाच्या दुकानात शूज खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यांनी ३९९ रुपयाचे शूज खरेदी केले. मात्र त्यांना दुकानदाराने ४०२ रुपयाचे बिल दिले. याविषयीची त्यांनी दुकानदार मालकाकडे विचारणा केली असता, यामधील तीन रुपये पेपर बॅगसाठी आकारण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. बाटा ही कंपनी स्वत: च्याच प्रमोशनकरता ग्राहकांकडून पैसे लुटत आहे. यासंदर्भात दिनेश यांनी बाटाविरोधात तक्रार केली. मात्र बाटा इंडियाने हा आरोप फेटाळून लावले. ग्राहक मंचाने पिशवीसाठी पैसे आकारणे सेवेत त्रुटीच आहे आणि आपली वस्तू विकत घेतल्यानंतर संबंधित ग्राहकाला कोणतेही पैसे न आकारता पिशवी देणे ही त्या दुकानाची जबाबदारी आहे, असे ग्राहक मंचाने सांगितले आहे. ग्राहक मंचाने बाटा इंडियाला आपल्या सर्व ग्राहकांना मोफत पेपर बॅग देण्याचा आदेश दिला आहे.

- Advertisement -

ग्राहक मंचाने बाटा इंडियाला पिशवीचे पैसे रिफंड करण्याचा आणि खटल्यासाठी आलेला एक हजार रुपये खर्च जमा करण्यास सांगितले आहे. तसेच ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल ३ हजार रुपये भरपाई म्हणून देण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे. याशिवाय राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या कायदेशीर विभागाशी संबंधित खात्यात ५ हजार रुपये डिपॉझिट करण्यास सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -