Eco friendly bappa Competition
घर राजकारण गुजरात निवडणूक गुजरात विधानसभा निवडणुकीत कुटुंबांमध्येच होणार राजकीय लढत; सख्ख्ये येणार आमने-सामने

गुजरात विधानसभा निवडणुकीत कुटुंबांमध्येच होणार राजकीय लढत; सख्ख्ये येणार आमने-सामने

Subscribe

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार असून, 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र यंदाची गुजरातची विधानसभा निवडणुकी विशेष असणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार असून, 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र यंदाची गुजरातची विधानसभा निवडणुकी विशेष असणार आहे. कारण या निवडणुकीत पिता-पुत्रांसह सख्ख्ये भाऊ, नणंद-भावजय एकमेकांविरोधात लढताना पाहायला मिळणार आहेत. (battle of gujarat election 2022 in father son brother sister in law )

गुजरातमध्ये विधानसभेच्या या निवडणुकीत काही मतदारसंघ असे आहेत. ज्याठिकाणी भाऊ त्याच्या खऱ्या भावाविरुद्ध लढणार आहे. वहिनी तिच्या खऱ्या मेव्हणीविरुद्ध लढणार आहे. मुलगा त्याच्या वडिलांविरुद्ध निवडणूक लढणार आहे. त्यामुळे यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

याशिवाय, जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे. पण रिवाबा सोलंकी यांची नणंद आणि जाडेजाची मोठी बहीण नयना त्यांना उघडपणे विरोध करत आहेत. तसेच, सूरत जिल्ह्यातील गुजरातमधील झगडिया विधानसभा मतदारसंघात पिता-पुत्रांमध्ये लढत होणार आहे.

ही राजकीय लढाई गुजरातचे सुप्रसिद्ध नेते आणि भारतीय आदिवासी पक्षाचे प्रमुख छोटू भाई वसावा आणि त्यांचा मुलगा महेश वसावा यांच्यात होत आहे. छोटू भाई वसावा हे झगडिया मतदारसंघातून बीटीपीचे उमेदवार आहेत, तर त्यांचा मुलगा महेश वसावा जनता दल यूचे उमेदवार आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! अमेरिकन वायूसेनेच्या दोन विमानांची हवेतच धडक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -