‘बीबीसी’च्या माहितीपटाचे हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून स्क्रीनिंग; प्रशासनाचे चौकशीचे निर्देश

'बीबीसी'चा ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाचा माहितीपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ हा माहितीपट युट्यूबनेही हटवला. तेव्हापासून हा माहितीपट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी आणली असतानाही हैदाराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून या माहितीपटाचे स्क्रिनींग केल्याची बाब उघडकीस आली आहे.

‘बीबीसी’चा ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाचा माहितीपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ हा माहितीपट युट्यूबनेही हटवला. तेव्हापासून हा माहितीपट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी आणली असतानाही हैदाराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून या माहितीपटाचे स्क्रिनींग केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. (BBC Documentary On Gujarat Riot Hyderabad University Student Screen After Government Ban)

‘बीबीसी’ने नुकताच गुजरात दंगलीबाबत ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाचा एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

दरम्यान, या माहितीपटावरून देशातील राजकीय वातावरण सध्या तापले आहे. शिवाय, केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार हा माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव यांनी आयटी नियम, २०२१ अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करत निर्देश जारी केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने बीबीसीच्या माहितीपटावर बंदी आणल्याच्या दुसऱ्या दिवशी हैदराबाद विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी गुजरात दंगलीवरील माहितीपटाचे स्क्रिनींग केल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे.

याप्रकरणी चौकशीचे निर्देश दिले असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून हे आरोप फेटळण्यात आले आहेत. तसेच, केंद्र सरकारने बंदी घालण्याच्या दोन दिवसांपूर्वी आम्ही या माहितीपटाचे स्क्रिनींग करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – झवेरी बाजारात ‘Special 26’, बोगस ईडी अधिकाऱ्यांनी छापेमारी करत लुटले 1.7 कोटी