घरदेश-विदेशBBC Documentary वरून जेएनयूनंतर आता जामिया विद्यापीठात राडा, 10 विद्यार्थ्यांना घेतलं ताब्यात

BBC Documentary वरून जेएनयूनंतर आता जामिया विद्यापीठात राडा, 10 विद्यार्थ्यांना घेतलं ताब्यात

Subscribe

जेएनयू विद्यापीठानंतर पंतप्रधान मोदींवर आधारित बीबीसीच्या डॉक्युमेंटरी स्क्रीनिंगवरून आता दिल्लीच्या जामिया विद्यापीठातही मोठा राडा झाला. या राड्यानंतर 4 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यानिषेधार्थ आंदोलन करणाऱ्या अन्य 7 विद्यार्थ्यांना देखील दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी एकूण 10 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. जामिया विद्यापीठाच्या चीफ प्रॉक्चरच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर विद्यापीठ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या वादानंतर जामिया विद्यापीठाचे सर्व गेट बंद करण्यात आले असून विद्यार्थ्यांना आत येण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान विद्यापीठाने कोणत्याही परवानगीशिवाय विद्यार्थ्यांची बैठक किंवा कोणत्याही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला परवानगी नसल्याचे आदेश दिले होते. तरी जामिया विद्यापीठातील विद्यार्थी बीबीसीच्या ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग करण्यावर ठाम होते.

- Advertisement -

यावेळी विद्यापीठाचे आदेश पायदळी तुडवत विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळी 6 वाजता गेट नंबर 8 जवळील MCRC लॉनमध्ये या डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग ठेवलं होते.

यावेळी जामिया विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली, तसेच लॉन आणि गेटजवळ कोणतीही बैठक अथवा सभा घेण्यास परवानगी नाकारण्यात आली. यावेळी विद्यापीठाने हितसंबंध गुंतलेल्या लोकांना/संस्थांना शांततापूर्ण शैक्षणिक वातावरण खराब करण्यापासून रोखण्यासाठी विद्यापीठ सर्व उपाययोजना करत आहे म्हणत याचे पालन करणाऱ्या आयोजकांवर कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे जाहीर केले.

- Advertisement -

मंगळवारी सायंकाळी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) बीबीसीच्या डॉक्युमेंट्री स्क्रीनिंगवरून मोठा वाद निर्माण झाला होता. याच विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी या डॉक्युमेंट्री स्क्रीनिंगचं आयोजन केलं होत. मात्र स्क्रीनिंगपूर्वी विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. विद्यापीठ प्रशासाने वीज आणि इंटरनेट पुरवठा खंडित केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता, यावेळी मोबाईल आणि लॅपटॉपवर डॉक्युमेंट्री पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही लोकांनी दगडफेक केली, हे हल्लेखोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य असल्याचा आरोप काहींनी केला आहे.


शिक्षकांचा खरा प्रतिनिधी विधान परिषदेत जावा म्हणून किरण पाटलांची निवड; फडणवीसांचं प्रतिपादन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -