Homeक्रीडाBCCI Contracts: बीसीसीआयच्या वार्षिक करारातून कोण इन कोण आऊट? वाचा सविस्तर...

BCCI Contracts: बीसीसीआयच्या वार्षिक करारातून कोण इन कोण आऊट? वाचा सविस्तर…

Subscribe

बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अय्यर आणि इशान किशन यांना वार्षिक करारात घेतले नाही. तर उत्तर प्रदेशातील डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला ग्रेड-सीमध्ये स्थान मिळाले आहे. कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा ए प्लस ग्रेडमध्ये आहेत हे विशेष.

नवी दिल्ली : बीसीसीआयने खेळाडूंसोबत केलेल्या वार्षिक करारांची यादी जाहीर केली आहे. 2023-24 साठी जाहीर झालेल्या या यादीत श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांची नावे नाहीत. दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतला नाही. यामुळे बोर्ड संतप्त असून, त्याचा परिणाम काँट्रॅक्ट यादीत दिसून आला. (BCCI Contracts Whos in and whos out of BCCIs annual contract Read more)

बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अय्यर आणि इशान किशन यांना वार्षिक करारात घेतले नाही. तर उत्तर प्रदेशातील डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला ग्रेड-सीमध्ये स्थान मिळाले आहे. कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा ए प्लस ग्रेडमध्ये आहेत हे विशेष.

बीसीसीआयने यावर्षी 30 खेळाडूंसोबत करार केला आहे. हा करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. बीसीसीआय बोर्डाने यावेळी नवी परंपरा सुरू केली आहे. त्यानी वेगवान गोलंदाजांसोबत वेगळा करारही केला आहे. या यादीत आकाश दीप, विजयकुमार वैश्यक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कवेरप्पा यांचा समावेश आहे.

हेही वाचा : MVA : महाविकास आघाडीचं ठरलं; जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच

अशी आहे खेळाडुंची वर्गवारी

बीसीसीआयने केलेल्या खेळाडुंसोबतच्या करारामध्ये खेळाडुंची वर्गवारी केली आहे. यामध्ये ग्रेड A+ मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तर ग्रेड A मध्ये रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. यासोबतच ग्रेड B मध्ये सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल आणि ग्रेड C मध्ये रिंकू सिंग, टिळक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीद कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार या खेळाडूंचा समावेश आहे.

हेही वाचा : Rajya Sabha: राज्यसभेत कोणाची किती ताकद? निवडणूक प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट

किती मिळतात खेळाडुंना पैसे?

ग्रेड ए प्लसमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. ए ग्रेडमधील खेळाडुंना 5 कोटी रुपये आणि बी ग्रेडला 3 कोटी रुपये मिळतात. सर्वात कमी सी श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले जातात.