घरदेश-विदेश'भाजपच्या कैदेतून मुक्त व्हा'; २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचे जनतेला आवाहन

‘भाजपच्या कैदेतून मुक्त व्हा’; २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचे जनतेला आवाहन

Subscribe

२०२४ साली भाजपला स्वबळावर बहुमत  मिळणार नसून इतर पक्ष सरकार स्थापन करतील असा दावाच ममता बॅनर्जी यांनी केला.

सध्या राज्यात आणि देशातच मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसंदर्भातील हालचाली या आत्तापासुनच सुरु झाल्या आहेत. देशाच्या राजकारणातील एक महत्वाचं नाव म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी(mamata banerjee) यांच्या नावाभोवतीही एक वलय आहे. दरम्यान २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेला आवाहन केले आहे. त्याचसोबत २०२४ साली भाजपला स्वबळावर बहुमत  मिळणार नसून इतर पक्ष सरकार स्थापन करतील असा दावाच ममता बॅनर्जी यांनी केला. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कलकत्ता शहरात शहिद दिनाच्या रॅलीला संबोधित करताना ममता यांनी भाजपवरही टीका केली.

हे ही वाचा –  उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस राहणार तटस्थ, सरचिटणीस अभिषेक बनर्जींनी केली घोषणा

- Advertisement -

ममता यांचं जनतेला आवाहन

भाजपाला बहुमत मिळालं नाही तर इतर पक्ष एकत्रितपणे सरकार स्थापन करतील. ‘भाजपच्या कैदेतून मुक्त व्हा आणि २०२४ मध्ये जनतेचे सरकार आणा’ असे आवाहन ममता(mamata banerjee) यांनी जनतेला केले. त्याचबरोबर कडधान्ये, अन्नधान्य आणि मैदा यांवर २५ किलो पेक्षा अधीक वजनाच्या सर्व प्रकारच्या पॅकेट्सवर जीएसटी लादणे ही जनतेविरोधी चाल आहे असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या. ‘भाजप सगळ्याच गोष्टींवर जीएसटी लावत असेल तर लोक काय खातील, देशातील गरीब जनता कशी राहिल? असा सवालही ममता यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

west bengal election 2021 mamata banerjee nandigram suvendu adhikari aide election campaign

हे ही वाचा – Mamata Banerjee Mumbai Visit : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल, कसा असेल…

बंगाल बाहेरही पक्ष विस्ताराची योजना

‘जर महाराष्ट्रप्रमाणे बंगालचे सरकार पडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ असा इशाराच बॅनर्जी यांनी भाजपला दिला. त्याचबरोबर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्याच्या बाहेरही पक्ष विस्तार आणि राज्याबाहेर जागा जिंकण्याच्या योजना आम्ही बनवत आहोत असं तृणमूल काँग्रेसचे(trinmul congress) जेष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी(abhishek banerjee) म्हणाले.

हे ही वाचा –  इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांचा राजीनामा; देशात राजकीय अस्थिरता

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -