घरदेश-विदेशबेअंत सिंग हत्या प्रकरणातील आरोपी बलवंत सिंग राजोआनांच्या दयेच्या अर्जावर 2 महिन्यांत...

बेअंत सिंग हत्या प्रकरणातील आरोपी बलवंत सिंग राजोआनांच्या दयेच्या अर्जावर 2 महिन्यांत निर्णय घ्या; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

Subscribe

पंजाबचे माजी मुख्यमंत्री बलवंतसिंग राजोआना यांना विशेष न्यायालयाने 2007 साली फाशीची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून जवळपास 26 वर्षांपासून ते तुरुंगात असून त्यांची दयेची याचिका 9 वर्षांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राजोआना यांच्या माफीबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला 30 एप्रिलपर्यंत वेळ दिला होता.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस संसद सदस्य मनीष तिवारी यांनी बलवंत सिंग राजोआना यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, “माजी मुख्यमंत्र्यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या राजोआनांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची वेळ आता आली आहे. याआधी पंजाबमधील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी राजोआना यांच्या सुटकेच्या मागणीवर जोरदार निदर्शने केली होती.

- Advertisement -

आनंदपूर साहिबचे काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी बुधवारी बलवंतसिंग राजोआना यांच्यावर म्हटले की, दहशतवादाचा बळी असल्याने मला माझे सहकारी रवनीत बिट्टूचे दुःख समजते, पण एक वकील आणि पंजाबचा खासदार म्हणून मला वाटते की, आता आपण पुढे जायला हवे. राजोआना यांनी यापूर्वी 26 वर्षे तुरुंगवास भोगला आहे. ते फाशीची शिक्षा भोगत असून 2007 पासून तुरुंगात आहे, त्यामुळे त्याच्या फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची वेळ आली आहे.

काँग्रेस खासदार रवनीती सिंह बिट्टू यांनी विरोध केला

- Advertisement -

यापूर्वी, बेअंत सिंग यांचे नातू आणि लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बलवंत सिंग राजोआना यांना दिलासा न देण्याची विनंती केली होती. राजोआना सुटले तर पंजाबचे भवितव्य विनाशकारी ठरू शकते, असे ते म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या मारेकऱ्याला माफी देण्याचा निर्णय चुकीचा संदेश जाईल, असे बिट्टू यांनी पत्रात लिहिले आहे. यामुळे देशाच्या शत्रूंना आपल्या मातृभूमीविरुद्ध भयंकर कट रचण्यास प्रोत्साहन मिळेल. एसएडीचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्या पत्राला उत्तर म्हणून बिट्टू यांनी हे पत्र लिहिले आहे.

सुखबीर सिंह बादल यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून बलवंत सिंह राजोआना यांच्या सुटकेची मागणी केली होती. त्यांनी लिहिले की, 2019 मध्ये श्री गुरू नानक देवजींच्या 550 व्या प्रकाश पर्वाला पंतप्रधानांनी 8 शीख कैद्यांची सुटका करण्याचे आश्वासन दिले होते. हे शीख कैदी होते ज्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढला आहे. पंतप्रधानांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून राजोआनाच्या सुटकेची प्रक्रिया गतिमान करावी. यावर काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी ट्विट केले की, सुखबीर बादल पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह 17 जणांना उडवणाऱ्या दहशतवाद्याच्या सुटकेची मागणी करत आहेत.

1995 मध्ये माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्यावर झाला होता बॉम्ब हल्ला

31 ऑगस्ट 1995 रोजी पंजाब नागरी सचिवालयाबाहेर झालेल्या स्फोटात माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग आणि अन्य 16 जण ठार झाले होते. या प्रकरणात बलवंत सिंग राजोआना यांना विशेष न्यायालयाने 2007 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांनंतर राजोआना यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावेत, अशी विनंती केली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला राजोआनाच्या सुटकेबाबत 30 एप्रिलपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते, ती आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.


कुणाचीही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही, अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -