घरदेश-विदेश१ एप्रिलपासून बिअरवरच भागवा; का ते वाचा?

१ एप्रिलपासून बिअरवरच भागवा; का ते वाचा?

Subscribe

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ एप्रिलपासून नवीन उत्पादन शुल्क सत्र सुरू होईल.

येत्या गुरुवारपासून नोएडा, गाझियाबादसह उत्तर प्रदेशातील सर्व भागात देशी आणि इंग्रजी दारू पिणे महाग होणार आहे. याचे कारण म्हणजे, १ एप्रिलपासून उत्तर प्रदेश सरकार दारूच्या किमतीत बदल करणार आहे. दारू पिणे महाग होणार असले तरी बिअरच्या किमती स्वस्त होणार आहेत. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ एप्रिलपासून उत्तर प्रदेशमध्ये नवीन उत्पादन शुल्क सत्र सुरू होईल. यावेळी उत्तर प्रदेशात देशी आणि इंग्रजी दारू, बिअरसंदर्भात नवीन नियम लागू केले जातील. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये अल्कोहोलबाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.

मद्य परवानगी शुल्क वाढले

१ एप्रिलपासून उत्तर प्रदेश सरकारने व्होडका, विदेशी दारू आणि स्कॉच वाईनवरील परमिट फीमध्ये वाढ केली आहे. यामुळे ६०० रुपयांहून अधिकच्या एक्स-कस्टम बॉन्ड मद्याच्या परवान्याच्या किमतीत वाढ झाली. या नव्या धोरणानुसार, उत्पादन शुल्क विभाग १ एप्रिलपासून बिअरची किंमत कमी करेल आणि देशी-इंग्रजी दारूच्या किमती वाढतील.

- Advertisement -

बिअरची किंमत किती?

उत्तर प्रदेश सरकारच्या नव्या नियमांमुळे बिअरच्या किमती १० ते ३० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या बिअरचा कॅन साधारण १३० रुपयांना मिळतो. मात्र, १ एप्रिलपासून बिअरचा एक कॅन केवळ १०० किंवा ११० रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तर २०० मिलीलिटर देशी दारूचा एक पॅक घेण्यासाठी पाच रुपये खर्च जास्त होईल. आता जर २०० मिलीलीटर देशी दारूची किंमत सध्या १०० रुपये असल्यास १ एप्रिलपासून त्यासाठी १०५ रुपये द्यावे लागतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -