घरताज्या घडामोडीकानाला ठणक्याने चिमुरडा हैराण, अखेर वर्षाने सापडला जिवंत कीडा

कानाला ठणक्याने चिमुरडा हैराण, अखेर वर्षाने सापडला जिवंत कीडा

Subscribe

आपल्या कानात काही तरी वळवळत आहे, ज्यामुळे खूपच त्रास होत असून कानाला सूजही येत असल्याची तक्रार एका मुलाकडून वारंवार करण्यात येत होती. अनेक रात्री या मुलाला झोप लागली नव्हती. अनेक डॉक्टरांकडे याबाबतचा सल्ला घेतल्यानंतरही या दुखीचे आणि सूज येण्याचे कारण समोर येत नव्हते. अवघ्या तीन वर्षाच्या अर्विड विल्हबॉर्गच्या कानाच्या दुखीचा त्रास जून २०२० मध्ये सुरू झाला. या मुलाच्या आईने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातूनही ही समस्या मांडली होती. अवघ्या एका वर्षाच्या मुलाला रात्रभर रडताना मी पाहिले आहे. अनेकदा तो स्वतःच्या डोक्यावर हात मारून घ्यायचा. आपल्या मुलाला नेमक काय होत हेच कळत नव्हते असे त्या आईने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. स्विडनमधील एका शहरात राहणाऱ्या या तीन वर्षाच्या मुलाच्या या कानातील दुखीचा उलगडा अखेर झाला.

आपल्या मुलाच्या कानाचे दुखणे असह्य झाल्यनेच आम्ही आपत्कालीन सेवेला बोलावले. या सेवेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले होते की, कदाचित तुमच्या मुलाला कानाचे इन्फेक्शन असू शकते. दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या तब्येतीत सुधार झाला. पण त्या मुलाला उपचारासाठी पालकांनी दवाखान्यात नेले. त्या तपासणी दरम्यान डॉक्टरांनी मुलाला वॅक्स प्लग असल्याचे सांगितले. कानाच्या आतल्या बाजुला अडथळा निर्माण झाल्यानेच कान दुखत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. डॉक्टरांनी हा वॅक्स प्लग असल्याचे अत्यंत तातडीने सांगितले. पण डॉक्टरांनी व्यवस्थित तपासणी करणे गरजेचे होते, असे आईचे म्हणणे होते. त्यानंतर वर्षभरात जवळपास सहा डॉक्टरांनी मुलाचा कान तपासला. त्यामध्ये सगळ्याच डॉक्टरांकडून वॅक्सिंग प्लगची समस्या असल्याचे सांगण्यात आले. अनेक उपाययोजना करूनही कानाची सूज आणि दुखणे यामध्ये विशेष फरक पडला नाही. कोणालाही किंचितही शंका आली नाही, की ही इअरप्लगची समस्या नसून दुसरे काही तरी असू शकते. अनेकदा डॉक्टरांनी या मुलाचा कान तपासताना पालकांना त्याला घट्ट पकडण्यास सांगितले. पण त्या मुलाचा कानच इतका दुखत होता की, त्या मुलाला एका ठिकाणी राहताही येत नव्हते.

- Advertisement -

अनेक ठिकाणी सल्ला घेतल्यानंतरही कानाचे दुखणे कमी होत नव्हते. त्यामुळेच एका हॉस्पिटलमध्ये त्या आईने कानातील वॅक्स प्लग काढण्याचा निर्णय घेतला. पण या वॅक्स प्लग काढताना सर्जनला कानात १.५ सेंटीमीटर मोठा असा काळ्या रंगाचा कीडा सापडला. महत्वाचे म्हणजे एक वर्षानंतरही हा किडा कानात जिवंत होता. हा कीडा सापडल्यानंतर अनेक डॉक्टरांना माझ्या पतीने सांगितले की, बघा आम्ही सांगत होतो, त्यापेक्षा नक्कीच काही तरी वेगळे सापडले. महत्वाचे म्हणजे कीड्यामुळे त्या मुलाच्या कानावर आणि एकण्याच्या क्षमतेवर फरक पडला नाही.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -