घरताज्या घडामोडीआत्महत्येपूर्वी सुशांतने Google वर सर्च केलं होतं Painless Death किवर्ड

आत्महत्येपूर्वी सुशांतने Google वर सर्च केलं होतं Painless Death किवर्ड

Subscribe

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता आणखी एक माहिती बाहेर येत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुशांत सिंह प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासाबाबतची माहिती दिली. त्यासोबतच बिहार पोलिसांना योग्य वागणूक दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र सुशांतने मृत्यूपुर्वी गुगलवर काही धक्कादायक गोष्टी सर्च केल्या होत्या. याबाबतही त्यांनी माहिती दिली. सुशांतने गुगलवर “painless death”, “schizophrenia” आणि “bipolar disorder” या किवर्डला सर्च केले होते.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या पाच दिवस अगोदर त्यांची एक्स मॅनेजर दिशा सालियान हीने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सुशांत तणावात होता. तिच्या मृत्यूचा संबंध सुशांतशी लावून खोट्यानाटे किस्से रचले जात असल्यामुळे त्याला मानसिक धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्यूपुर्वी जवळपास दोन तास तो स्वतःचे नाव सर्च करत असल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले आहे. सुशांतच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये त्याने गुगलवर सर्च केलेल्या शब्दांचा खुलासा झाला आहे.

- Advertisement -

सुशांत मृत्यूपुर्वी त्याच्याशी संबंधित काही लेख गुगलवर शोधत होता. त्याच्याबाबत काय लिहिले जात आहे. याचा तो शोध घेत होता. यादरम्यान त्याने “painless death”, “schizophrenia” आणि “bipolar disorder” हे शब्द सर्च करुन त्याबाबत शोध घेतला होता, अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली.

पत्रकार परिषदेत आतापर्यंतच्या तपासाबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त म्हणाले की, आम्ही सुशांतच्या मृत्यूनंतर आम्ही सर्वात आधी त्याच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवला होता. त्यामध्ये त्यांनी कुणावरही संशय घेतला नव्हता. सुशांतच्या बहिणी आणि त्याच्या वडिलांच्या जबाबात रेहाचा उल्लेख आला नव्हता. मात्र त्यानंतर बिहार पोलिसांना त्यांनी एफआयआरमध्ये काय म्हटले, त्याबाबत आम्ही काहीही बोलू इच्छित नाही. कारण आमच्याकडे सर्वात आधी जबाब नोंदविल्यामुळे त्यावर जास्त विश्वास ठेवता येऊ शकतो. कारण जबाब नोंदविण्यासाठी समोरच्या व्यक्तिला वेळ मिळत नसतो, त्यामुळे जबाबात सर्व खरे बाहेर येत असते.

- Advertisement -

बिहारला जो एफआयर दाखल झाला त्याबाबत बोलताना परमबीर सिंह म्हणाले की, जेव्हा ज्युरीसडिक्शनच्या बाहेर जाऊन तक्रार दाखल होते, तेव्हा झिरो एफआयआर दाखल करुन तो गुन्हा घडलेल्या ठिकाणी वळता करावा लागतो. बिहार पोलीस कोणत्या आधारावर मुंबईत तपासासाठी आली आहे, याबाबत कोणतेही कागदपत्रे त्यांनी सादर केली नसल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -