घरदेश-विदेशनिवडणुकीपूर्वी जनतेच्या भावनांना हात घालायचा आणि... ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

निवडणुकीपूर्वी जनतेच्या भावनांना हात घालायचा आणि… ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानेच महागाई वाढण्याचा इशारा दिला आहे. आता दिवाळी संपताना महागाईचा ‘बॉम्ब’ फोडण्याचा हा प्रकार योगायोग म्हणायचा की सरकारची चाल? निवडणुकीपूर्वी जनतेच्या भावनांना हात घालायचा आणि निवडणुका संपल्या की जनतेच्या खिशात हात घालायचा. आताही दिवाळी संपता संपता मोदी सरकारने तेच केले आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा प्रवेश; 70 धावांनी न्यूझीलंडला केलं पराभूत

- Advertisement -

नेहमीप्रमाणे या दरवाढीसाठी बोट दाखवायला निसर्ग आणि जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आहेतच. या वर्षी कमी झालेला पाऊस, लांबलेला मान्सून, त्यात बसलेले अवकाळीचे तडाखे, त्यामुळे कमी झालेली खरिपाची पेरणी, धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामावर होणारा परिणाम, जागतिक पातळीवर इंधन आणि अन्नधान्य पुरवठा याबाबत असलेली अनिश्चितता अशी अनेक कारणे केंद्र सरकार देशातील महागाईबाबत पुढे करणार, हे स्पष्ट आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी प्रत्येक बाबतीत फक्त बोट दाखवून हात वर करणार असाल तर तुम्ही सत्तेत का बसला आहात? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.

बुधवारी भाऊबीज उत्साहात पार पडली आणि ‘महागाई वाढणार’ असे सांगत केंद्र सरकारने दिवाळीच्या उत्साहावर विरजण टाकले. दिवाळीपर्यंत थोपवलेल्या महागाईला ‘पुढे चाल’ देण्याचाच हा प्रयत्न आहे. कारण मोदी सरकारचा हा नेहमीचा फंडा आहे. निवडणुका आल्या की इंधन गॅस दरवाढ रोखायची, प्रसंगी त्यांच्या दरात कपात करायची आणि महागाई कमी केल्याचे ढोल पिटायचे. निवडणुका पार पडल्या की परत महागाई जैसे थे करायची. आताही दिवाळी संपता संपता मोदी सरकारने तेच केले आहे, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कुलाब्यातील उद्यान फक्त महिलांसाठी राखीव ठेवण्याची माजी नगरसेवकाची मागणी

वास्तविक, या परिस्थितीतून मार्ग काढत सामान्यांना कमीत कमी त्रास कसा होईल, हे राज्यकर्ते म्हणून तुम्ही पाहायला हवे. मात्र त्याऐवजी असलेल्या-नसलेल्या कारणांकडे बोट दाखवायचे आणि दरवाढीच्या जबाबदारीपासून हात झटकायचे. 2014 पासून देशात हेच सुरू आहे. त्यामुळेच महागाई आणि दरवाढ ही सामान्य जनतेसाठी ‘विशेष’ गोष्ट राहिलेली नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -