Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम भयानक! कचऱ्यात सापडले महिलेच्या नग्न मृतदेहाचे १५ तुकडे, पण मुंडकं गायब!

भयानक! कचऱ्यात सापडले महिलेच्या नग्न मृतदेहाचे १५ तुकडे, पण मुंडकं गायब!

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशमधलं हथरस बलात्कार आणि हत्या प्रकरण सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरलेलं असतानाच अजून एका प्रकरणामुळे उत्तर प्रदेशमधलं गुन्हेगारी विश्व चर्चेत आलं आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठजवळ एका ३५ वर्षीय महिलेच्या नग्न मृतदेहाचे १५ तुकडे सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या महिलेच्या शरीरावर एकही वस्त्र नसल्यामुळे तिच्यावर आधी बलात्कार करण्यात आला आणि नंतर पुरावे मिटवण्यासाठी तिची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे, या तुकड्यांमध्ये महिलेचं डोकं गायब आहे. त्यामुळे तिची ओळख पटू नये, म्हणून डोकं गायब केलं असल्याचा अंदाज देखील उत्तर प्रदेश पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कचऱ्याच्या ढिगावर पडले होते तुकडे!

मेरठ जवळच्या लिसाडीगेट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एका पोत्यामध्ये भरलेल्या अवस्थेत एका महिलेच्या शरीराचे १५ तुकडे भरल्याचं आढळून आलं. जेव्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून दुर्गंधी येऊ लागली, तेव्हा स्थानिकांना संशय आला. जेव्हा ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा काही कुत्री या मृतदेहाच्या तुकड्यांचा लचका तोडत असल्याचं दिसून आलं. लागलीच पोलिसांना पाचारण केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. दोन पोत्यांमध्ये हे तुकडे भरण्यात आले होते.

- Advertisement -

murder
प्रातिनिधीक फोटो

दरम्यान, शरीराचे तुकडे पाहून पोलिसांनी महिलेचं वय अंदाजे ३५ असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचं पथक कामाला लागलं असून आसपासच्या परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेमध्ये मेरठ आणि आसपासच्या भागामध्ये खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण आहे.

- Advertisement -