Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी पुतिन यांच्या भेटीनंतर बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांची प्रकृती बिघडली, विषबाधा झाल्याचा संशय

पुतिन यांच्या भेटीनंतर बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांची प्रकृती बिघडली, विषबाधा झाल्याचा संशय

Subscribe

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर काही वेळातच बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लुकाशेन्को यांची प्रकृती चिंताजनक आहे. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष हे व्लादिमीर पुतिन यांच्या अत्यंत जवळचे नेते मानले जातात. लुकाशेन्को यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तत्काळ मॉस्कोमधील सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याआधी त्यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याशी भेट घेतली होती. सध्या त्यांना डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे बेलारूसचे विरोधी पक्षनेते वालेरी सेपकालो यांनी म्हटलं आहे.

एवढेच नाही तर बेलारूसच्या विरोधी पक्षनेत्याने राष्ट्रपतींना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
बेलारूसच्या राष्ट्रपतींना रुग्णालयात नेण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जेणेकरुन कोणालाही संशय येऊ नये. क्रेमलिनमधूनही विषबाधा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

काही दिवसांपासून लुकाशेन्को यांच्या प्रकृतीबाबत चर्चा होत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष रशियाला पोहोचले होते आणि विजय दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाले होते. मात्र, व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या जेवणाला ते उपस्थित राहिले नाहीत आणि लगेच परतले. याबाबत अनेक चर्चाही झाल्या.

६८ वर्षीय लुकाशेन्को हे व्लादिमीर पुतिन यांच्या अगदी जवळचे नेते मानले जातात. सध्या बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार,
एकीकडे अलेक्झांडर लुकाशेन्को यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर दुसरीकडे त्यांचे विमान मॉस्कोहून राजधानी मिन्स्कला पाठवण्यात आले आहे. याचे कारण असे आहे की, लुकाशेन्कोच्या हॉस्पिटलायझेशनची माहिती लपवली जाऊ शकते.


- Advertisement -

हेही वाचा : कलम 355 लागू असूनही…; मणिपूर हिंसाचारप्रकरणी काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल


 

- Advertisment -