बेळगाव लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी बेळगाव एकिकरण समिती आणि शिवसेना एकत्र आहे असे सांगत एकिकरण समितीचा उमेदवारच विजयी होईल असे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आता बेळगाव पोटनिवडणूकमध्ये आमचाच उमेदवार विजयी होणार अशा प्रकारचे वक्तव्ये रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारमधील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी आलो आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः मला पाठवले असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळके याच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये आलो आहे, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना एकत्र येऊन या तरुण उमेदवाराला पाठबळ दिले आहे. महाराष्ट्रातील सर्वच राज्यांनी उमेदवार शुभम शेळके याला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की बेळगावमध्ये जा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळकेला सक्रिय पाठिंबा द्या म्हणून इथे आलो आहे. सुरुवातील एकीकरण समितीच्या उमेदवाराला ५० हजार मते मिळतील का नाही असे वातावरण होते यामुळे थोडी निराशा होती परंतु आता या उमेदवाराला ५० हजारांपेक्षा जास्त मत मिळून विजयी होईल असे चित्र निर्माण झाले आहे. अशा प्रकारची लढत आहे.
एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी मुसंडी मारली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचाराला येत आहेत. यानंतर प्रधानमंत्री येत आहेत की नाही माहिती नाही. पण जर एवढी ताकद लावायला लागत असेल तर शुभम शेळके एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळके यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. हे चित्र स्पष्ट दिसत आहे. बेळगाव पोटनिवडणूकीबाबात महाराष्ट्रात प्रचंड उत्सुकता आहे. तसेच मला खात्री आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार विजयी होईल.
बेळगावमध्ये निश्चिंतपणे एकीकण समितीचा कार्यकर्ता प्रचार करत आहे. आमचे भांडण इथल्या लोकांशी किंवा सरकारशी नाही आहे तर विचारांची लढाई आहे. भाषा आणि संस्कृतीची लढाई आहे. अशा लढाया अनेक वर्ष सुरु असतात. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशातून केलेला प्रचार या महाराष्ट्र एकीकरण समितीला प्रकाशाची वाट दाखवणार आहे असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.