Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश TMC कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही; ममता बॅनर्जींचा BJP ला इशारा

TMC कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही; ममता बॅनर्जींचा BJP ला इशारा

Related Story

- Advertisement -

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. यावेळी ममता दीदींनी भाजपाला फक्त निवडणुका होऊ द्या, त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांना मी सोडणार नाही, असा इशारा भाजपाला दिलाय. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि निमलष्करी दलांच्या विश्वासार्हतेवरही यावेळी त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी असंही म्हटलं की, भाजप आमच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ला करीत आहे, गुरूवारीही त्यांनी नंदीग्राममध्ये माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला, निवडणुकीमुळे मी शांत आहे, त्यांच्याशी कसं वागायंच हे मला चांगलंच माहित आहे. या निवडणूकीचं गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्णपणे आयोजन केलं आहे. सीएमपीएफ आणि बीएसएफ यांनी गुरूवारी नंदीग्राममध्ये एक हत्याकांड घडवून आणले, मला केंद्रीय सैन्याने आवाहन करायचे आहे की, भाजपाच्या इशाऱ्यावर लोकांना धमकावणे थांबवावे, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली.

- Advertisement -

ममता बॅनर्जी पुढे असेही म्हणाल्या, मी माझ्या आई आणि बहिणींना आवाहन करतेय, जर केंद्रीय सैन्याच्या जवानांनी तुमच्याकडे येऊन तुम्हाला धमकावले तर त्यांना विरोध करा. त्यांच्याकडे (भाजपकडे) पैसे, गुंड, बॉम्ब आणि बंदुका असतील तर त्यांच्याकडे अमित शाह आहेत, ज्यांनी गुजरातमध्ये दंगली घडवून आणल्या आहेत. मी एकटीच लढा देत आहे आणि मला पराभूत करण्यासाठी मला १००० नेते आहेत. ‘मला नंदीग्रामच्या जनतेचे अभिनंदन करायचे आहे, येथे खूप चांगले मतदान झाले आणि काळजी करू नका, आपण विजयाच्या मार्गावर आहोत, भाजपने असा विचार केला असेल की त्यांनी माझ्यावर हल्ला केला तर मी प्रचार करू शकणार नाही, मी शेख हसीना जी यांच्याशी बोलली आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न संयुक्तपणे सोडवला, त्यावेळी भाजप कुठे होता?’, असा सवालही ममता बॅनर्जी यांनी जनतेशी संवाद साधताना उपस्थितीत केला.


- Advertisement -