घरताज्या घडामोडीBengal Assembly Election 2021: मालकीची झोपडी, ३० हजारांची सेव्हींग, अन् मजूर नवरा,...

Bengal Assembly Election 2021: मालकीची झोपडी, ३० हजारांची सेव्हींग, अन् मजूर नवरा, तरीही आमदारकी खेचली

Subscribe

आमदार चंदना बाउरी यांचे पती मजूर असून त्यांच्याकडे मालकीची शेतजमीन नाही.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणूकीत भाजप आणि टीएमसीमध्ये अटीतटीची लढाई पाहायळा मिळाली होती. अखेर ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूकीबाबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा होतच आहे. परंतु भाजपच्या एक महिला आमदाराचीही चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या सालटोरा मतदार संघातील चंदना बाउरी यांनी टीएमसीचे उमेदवार संतोष मंडल यांना परभूत केले आहे. चंदना बाउरी यांच्या विजयापेक्षा त्यांच्या संपत्ती आणि घरावर अधिक चर्चा होत आहे.

भाजप नेते सुनील देवधर यांनी ट्विट करत चंदना बाउरी यांच्याबाबत माहिती दिली आहे. सुनील देवधर यांनी म्हटले आहे की, चंदना बाऊरी यांची बचत फक्त ३१ हजार ९८५ रुपये आहे. त्या झोपडीसारख्या घरात राहतात. त्या घरात वीजेचे कनेक्शनही नाही. चंदना या अनुसूचित जातीच्या असून त्यांच्याकडे ३ बकरी आणि ३ गाय एवढी संपत्ती आहे. असे ट्विट भाजप नेते सुनील देवधर यांनी केले आहे.

- Advertisement -

चंदना बाउरी यांनी आपल्या उमेद्वारी अर्जात तसेच निवडणुक आयोगाला दिलेल्या शपथ पत्रात असा उल्लेख केला आहे की, त्यांच्या खात्यामध्ये फक्त ६३३५ रुपये आहेत. तसेच त्यांच्या पतीच्या खात्यात १ हजार ५६१ रुपये जमा आहेत. त्यांची एकुण संपत्ती ३१ हजार ९८५ रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. परंतु त्यांची एकुण स्थावर मालमत्ता ३० हजार ३११ रुपये आहे.

- Advertisement -

आमदार चंदना बाउरी यांचे पती मजूर असून त्यांच्याकडे मालकीची शेतजमीन नाही. रोजंदारी करुन आपले घर चालवत असल्याचे चंदा बाउरी यांनी म्हटले आहे. तसेच स्वतःही मजुरी करुन पतीला घर चालवण्यात हातभार लावतात. चंदना बाउरी ह्या बारावी शिकलेल्या असून त्यांच्या पतीचे आठवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. दोघांकडे मनरेगा कार्ड आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत त्यांना ६० हजार रुपयाचा हप्ता मिळाला होता. या पैशातून त्यांनी आपल्या घराची डागडुजी केली होती. एवढ्या हालाकीच्या परिस्थितीत देखील न घाबरता त्यांनी आमदारकी मिळवली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या चर्चा सर्वत्र होत आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -