घरदेश-विदेशभाजपच्या युवा नेत्या पामेला गोस्वामीच्या कारमध्ये सापडलं कोकेन; पोलिसांनी केली अटक

भाजपच्या युवा नेत्या पामेला गोस्वामीच्या कारमध्ये सापडलं कोकेन; पोलिसांनी केली अटक

Subscribe

बंगालमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगालमधील भाजपच्या युवा मोर्चाची महिला नेत्या पामेला गोस्वामीला कोकेन बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पामेला गोस्वामीच्या गाडीमध्ये कोकेन सापडलं. पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं. कोलकात्यातील न्यू अलिपूर भागातील एनआर अव्हेन्यू येथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पामेला गोस्वामीसोबत तिचा मित्र प्रोबीर कुमार डे हा देखील होता. त्याला देखील अटक केली आहे.

पामेला गोस्वामी कोकेन घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी प्लॅन रचत तिला रंगेहाथ पकडलं. पोलिसांनी कोलकाताच्या न्यू अलीपूर भागात तिची गाडी अडवली. यावेळी गाडीत तिच्यासोबत तिचा मित्र प्रोबीर कुमार डे हा देखील होता. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीत लाखो रुपयांचे ड्रग्ज मिळाले.

- Advertisement -

अटकेच्या वेळी पामेला गोस्वामी सोबत केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान होते. पोलीस सध्या पामेलाची चौकशी करत आहेत. तिला उद्या न्यायालयात हजर केले जाईल. बाजारात या कोकेनची अंदाजित किंमत कोट्यवधी रुपये सांगितली जात आहे. पामेला ही भाजप युवा मोर्चाशी संबंधित आहेत. ती हुगळी जिल्ह्याची सरचिटणीस आहे. ती सतत सोशल मीडियावर भाजपच्या मेळाव्यांची छायाचित्रे अपलोड करते. पामेला ही भाजपच्या नेत्यांसमवेत प्रचार करताना दिसली.


हेही वाचा – १ मार्चपासून लोकप्रतिनिधींना कोरोना लस देणार – महापौर

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -