घरदेश-विदेशममता बॅनर्जी यांची हॅट्ट्रिक?

ममता बॅनर्जी यांची हॅट्ट्रिक?

Subscribe

प.बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकीचे आज निकाल

पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. पाच राज्यांपैकी सर्व देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस सत्तेची हॅट्ट्रिक करेल, असा अंदाज आहे. एक्झिट पोलच्या अंदाजात सुद्धा हाच अंदाज समोर आला होता. पश्चिम बंगालमधील निवडणूक ही ममता बॅनर्जी आणि भाजप या दोघांसाठी अटीतटीची ठरली असून या निवडणुकीत भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली होती. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते ताकदीने उतरले होते. पण, ममता यांनी सुद्धा झंझावाती प्रचार करत पश्चिम बंगाल डावलून काढला होता.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 142 ते 152 जागा तृणमूल काँग्रेसला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजप या निवडणुकीत 125 ते 135 जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे. डावे आणि काँग्रेस आघाडीच्या पारड्यात अवघ्या 16 ते 26 दरम्यान जागा पडण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या. पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 292 जागांवर मतदान झाले. पश्चिम बंगालमधील विधानसभा जागांची संख्या 294 आहे. परंतु कोरोना संक्रमणामुळे दोन उमेदवारांचा मृत्यू झाला. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर आणि शमशेरगंज विधानसभा मतदारसंघात 16 मे रोजी मतदान होणार आहे.

- Advertisement -

आसाम आणि पाँडेचेरीमध्ये भाजप सत्तेत येईल, असा अंदाज असून तामिळनाडूत डीएमकेची सत्ता येईल, अशी दाट शक्यता आहे. केरळमध्ये एलडीएफ बाजी मारेल, असे चित्र आहे. पाच राज्यांच्या या निवडणुकीत काँग्रेसला मात्र फारसे यश मिळताना दिसत नाही, याविषयी राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -