घरदेश-विदेशकाँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करा; कोर्टाचे आदेश

काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करा; कोर्टाचे आदेश

Subscribe

नवी दिल्ली : कॉपीराईट उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचं ट्विटर अकाऊंट तात्पुरते ब्लॉक करण्याचे आदेश बंगळुरु उच्च न्यायालयाने दिले आहेत. भारत जोडो यात्रेच्या व्हिडीओसाठी काँग्रेसने KGF Chapter 2 चित्रपटातील म्युझिकचा वापर केल्याप्रकरणी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणी एमआरटी म्युझिकने राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेट यांच्याविरोधात यशवंतपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

बंगळुरू उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांना अद्याप आदेशाची प्रत मिळालेली नाही. काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांना बंगळुरू उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत सोशल मीडियावरून माहिती मिळाली आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी पक्षकाराच्या वतीने कोणीही न्यायालयात उपस्थित नव्हते. या प्रकरणाबाबत आम्ही आमच्या स्तरावर कायदेशीर सल्ला घेत आहोत.

- Advertisement -

बेंगळुरूच्या एका न्यायालयाने ट्विटरला KGF Chapter-2 चित्रपटाच्या साउंड रेकॉर्डचा बेकायदेशीरपणे वापर करून MRT म्युझिकच्या मालकीच्या वैधानिक कॉपीराइटचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रा यांचे अकाऊंट तात्पुरती ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.

एमआरटी म्युझिक कंपनीने आपल्या तक्रारीत म्हटले की, केजीएफ-२ गाण्याचे हिंदीतील हक्क मिळवण्यासाठी खूप पैसे मोजले आहेत. राष्ट्रीय राजकीय पक्षाने केलेली ही बेकायदेशीर कृत्याने कायद्याचे नियम आणि खाजगी व्यक्ती आणि संस्थांच्या अधिकारांकडे त्यांची घोर अवहेलना दर्शवतात. देशावर राज्य करण्याची संधी मिळावी आणि सामान्य माणूस आणि व्यवसाय यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदे बनवण्याच्या शोधात ते ही भारत जोडो यात्रा आयोजित करत आहेत.


महापालिका निवडणुकांआधीच शिंदे-फडणवीस सरकारनं भाकरी फिरवली, 104 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -