घरताज्या घडामोडीOmicronमधून रिकव्हर झाल्यानंतर बंगळुरूच्या डॉक्टराला पुन्हा कोरोनाची लागण

Omicronमधून रिकव्हर झाल्यानंतर बंगळुरूच्या डॉक्टराला पुन्हा कोरोनाची लागण

Subscribe

देशात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. २ डिसेंबरला देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे एंट्री केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली होती. २ डिसेंबरला २ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. हे दोन्ही रुग्ण बंगळुरूमद्ये आढळले होते. त्यापैकी एक रुग्ण प्रशासनाला न सांगता दुबई गेला. तर एका रुग्णावर बंगळुरूमध्ये उपचार सुरू होता. हा रुग्ण डॉक्टर होता. हा डॉक्टर ओमिक्रॉनमधून रिकव्हर झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

बंगळुरू महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, जो डॉक्टर ओमिक्रॉनबाधित आढळला होता, तो पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या डॉक्टर आयसोलेशनमध्ये असून अजूनपर्यंत त्याच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. या ओमिक्रॉनबाधित डॉक्टराने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याशिवाय त्याची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री देखील नव्हती.

- Advertisement -

माहितीनुसार जो ओमिक्रॉनबाधित व्यक्ती दुबईला गेला आहे, त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. एवढेच नाही तर तो क्वारंटाईन असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या मॅनेजमेंट आणि स्टाफ विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीवर कर्नाटक महामारी कायद्याच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतातून दुबईला कसा पोहोचला हा व्यक्ती?

  • दक्षिण आफ्रिकेतून हा व्यक्ती निगेटिव्ह अहवाल घेऊन २० नोव्हेंबरला भारतात पोहोचला होता. बंगळुरू विमानतळावर त्याची स्क्रीनिंग आणि चाचणी करण्यात आली होती.
  • मग २० नोव्हेंबरला त्याने एका हॉटेलमध्ये चेक इन केले. परंतु त्याची कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
  • त्यानंतर प्रशासनाकडून डॉक्टरांची टीम हॉटेलमध्ये पोहोचली. तेव्हा त्या व्यक्तीमध्ये कोणतीही वेगळी लक्षणे दिसून आली नाहीत. त्याला हॉटेलमध्ये सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला.
  • २२ नोव्हेंबरला त्या व्यक्तीचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले.
  • २३ नोव्हेंबर त्याने खासगी प्रयोगशाळेतून चाचणी केली आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आला.
  • आतापर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या २४ जणांची चाचणी केली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
  • तसेच २३ नोव्हेंबरला २४० सेकेंडरी कॉन्टॅक्ट्सची तपासणी केली असता त्यांचेही अहवाल निगेटिव्ह आले.
  • त्यानंतर रुग्णाने २७ नोव्हेंबरला हॉटेलमधून चेक आउट केले आणि विमानतळावर जाण्यासाठी कॅब केली. मग त्याने दुबईचे विमान पकडले.

हेही वाचा – Omicron Variant: बापरे! ब्रिटनमध्ये कम्युनिटी स्प्रेड सुरू; २४ तासांत ओमिक्रॉनच्या ९० रुग्णांची नोंद


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -